accident  esakal
पुणे

Accident: आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने दोघांना चिरडलं; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

MLA Dilip Mohiten nephew Accident: पुणे-नाशिक महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

पुणे- आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने दुचाकीला उडवलं आहे. यात दुचाकीवर असलेल्या एकाचा मृत्यू झालाय, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा अपघात झाला. आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याच्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झालाय. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहितेंचा पुतण्या पुण्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या एका टू-व्हीलरच्या कारची धडक बसली. अपघात भीषण होता. दुचाकीचा चुराडा झाला आहे, तर कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या सुमाराच हा अपघात झाला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप मोहितेंच्या पुतण्याने १९ वर्षीय ओम भालेरावला चिरडलं आहे. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळी अकरा वाजता त्याच्यावर अंत्यस्कार करण्यात आले आहेत.

दिलीप मोहिते-पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. माझा पुतण्या अपघातानंतर पळून गेला नाही. शिवाय त्याने मद्य प्राशन केले नव्हते. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन यावर बोलेन असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विरोधकांनी यावरून निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT