पुणे

Vidhan Sabha 2019 : जगदीश मुळीक यांचा विजय निश्चित; संजय काकडे यांना विश्वास

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी (पुणे) : वडगावशेरी मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या मतदारसंघामध्ये आमदार जगदीश मुळीक यांचे काम चांगले आहे. मतदारसंघात आमदार मुळीक नगरसेवक आणि पदाधिका-यांची टीम चांगली आहे. यामुळे वडगाव शेरी मतदारसंघामध्ये आमदार जगदीश मुळीक हे निवडणूक येणार हे निश्चित आहे. यामुळे विरोधक सध्या तरी अनामत रक्कम जप्त होऊ नये, यासाठी काम करत असल्याचे मत खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले. 

वडगावशेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप  आणि शिवसंग्राम या महायुतीचे उमेदवार आमदार जगदिश मुळीक यांनी आज आनंद पार्क, भैरवनगर, मुंजाबावस्ती, धानोरी गावठाण, कवलड मशिद गल्ली, कलवड जकात नाका या भागामध्ये पदयात्रेव्दारे प्रचार केला.

या पदयात्रेत राजू केसकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार काकडे बोलत होते. यावेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक अनिल टिंगरे, योगेश मुळीक, नाना सांगडे, राहुल भंडारे, नगरसेविका ऐश्वर्या जाधव, आबा खलसे, चंद्रकांत टिंगरे, आनंद गोयल, अशोक कांबळे, सचिन खांदवे, विशाल टिंगरे, किरण भालेराव, धनंजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

काकडे म्हणाले, की आमदार जगदीश मुळीक यांनी गेल्या पाच वर्षामध्ये वडगाव शेरी मतदारसंघामध्ये अनेक विकास कामे केली आहेत. या विकासकामांमुळे वडगाव शेरीचा कायापालट झाला आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार आमदार मुळीक यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मुळीकांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. 

यावेळी मुळीक म्हणाले, की धानोरी-टिंगरेनगर ने भाजपला नेहमी साथ दिली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये या प्रभागामधून भाजपला चांगले मतदान झाले होते. त्यामुळे सहज मोठ्या मताधिक्याने आपण निवडून येणार अशी मला खात्री आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

SCROLL FOR NEXT