MNS_Pune 
पुणे

Video : पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत 'मनसे'चं बेड टाकत आंदोलन; पाहा काय केल्या मागण्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी बेड मिळत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी सोमवारी (ता.२७) पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत बेड टाकून निषेध आंदोलन केले.

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाकडून पुरेशा सुविधांचा पुरवठा केला जात नाही. तसेच शहरातील रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. उपचारात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत बेड टाकून आंदोलन केले.

दुसरीकडे, पुणे महापालिकेने आतापर्यंत कोरोनासाठी २०० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. मग २०० कोटी रुपये खर्च झाले असताना अजूनही सर्वसामान्य नागरिकांना बेडसाठी हॉस्पिटलबाहेर रांगा लावाल्या लागत आहेत. बेडच्या प्रतिक्षेत त्यांना रस्त्यावर ताटकळत बसावे लागत आहे. त्यांच्यासाठी रुग्णालयात बेड का उपलब्ध होत नाहीत? 

पुणे महापालिकेने ज्या रुग्णालयांसोबत करार केला आहे, ती रुग्णालये अक्षरशः लॉजिंग अँड बोर्डिंग झाली असल्याचा आरोपही वसंत मोरे यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागं व्हावं आणि महापालिकेसोबत करार असलेल्या खाजगी रुग्णालयात गरजू रुग्णांना कसे बेड मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी वसंत मोरे यांनी यावेळी केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT