पुणे

आधुनिक फलोत्पादन तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी शेतकऱ्यांचा दौरा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

CD

आधुनिक फलोत्पादन
तंत्रज्ञानासाठी अभ्यास दौरा

वाशीमसाठी २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

वाशीम : आधुनिक फलोत्पादन तंत्रज्ञानाची माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्यांतर्गत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या दौऱ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र शेतकऱ्यांकडून शुक्रवार (ता.२०) पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

सन २०२६-२७ या वर्षासाठी अभियानाच्या मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी पाच दिवसांचे प्रत्यक्ष शेतावरील प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. या प्रशिक्षणात आधुनिक फलोत्पादन पद्धती, सुधारित लागवड तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन तसेच कीड व रोग नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

याशिवाय फलोत्पादन क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रांना भेटी देऊन त्यांच्या शेतीतील प्रयोग, तंत्रज्ञान आणि अनुभव जाणून घेण्याची संधी सहभागी शेतकऱ्यांना मिळणार आहे. या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याचा आपल्या शेतीत अवलंब करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. परिणामी फलोत्पादन पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढण्यासह शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न सुधारण्यास मदत होईल.

या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यास इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांमार्फत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करावेत. प्राप्त अर्जांची छाननी करून अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: “आम्ही सहज जिंकू असं वाटलेलं, पण…”, भारताच्या २४४ धावांच्या लाजीरवाण्या पराभवानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर काय म्हणाला?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला स्व. अजित पवार यांचं नाव मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Neha Bora: नेहा बोरा म्हणतात 'मी स्त्री नाही अन् पुरुषही नाही'! नॉन-बायनरी म्हणजे नक्की काय?

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांची गॅस वितरण कार्यालयाकडूनही लूट सुरू

SCROLL FOR NEXT