chaff technology
chaff technology Sakal
पुणे

भारतीय हवाईदलासाठी डीआरडीओने विकसित केले आधुनिक तंत्रज्ञान

सकाळ वृत्तसेवा

पुणे - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) (DRDO) भारतीय हवाई दलासाठी (Indian Air Force) आधुनिक ‘शाफ’ तंत्रज्ञान (Chaff Technology) विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने हवाईदलाचे लढाऊ विमानाला (Plane) शत्रूच्या रडारच्या धोक्यापासून वाचविणे शक्य आहे. हे तंत्रज्ञान डीआरडीओ अंतर्गत येणाऱ्या पुण्यातील उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा (एचईएमआरएल) आणि जोधपूर येथील संरक्षण प्रयोगशाळा यांच्या वतीने तयार करण्यात आले आहे.

सध्याच्या बदलत्या युद्धनीतीला पाहता आधुनिक रडार तंत्रज्ञानाचे धोके ही वाढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये लढाऊ विमानांचे संरक्षण ही काळाची गरज झाली आहे. तसेच या महत्त्वाच्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या संशोधनामुळे डिआरडीओने आत्मनिर्भर भारताच्या दिशेने प्रगतशील पाऊल टाकले आहे. तर भारतीय हवाई दलाला दरवर्षी आवश्यक असलेल्या शाफचा पुरवठा व्हावा यासाठी हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी उद्योगांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय हवाई दल तसेच उद्योग क्षेत्राचे कौतुक केले. तसेच भारतीय हवाई दलाच्या क्षमतेत भर टाकणाऱ्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या यशस्वी शोधाशी संबंधित पथकांचे केंद्रीय संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी अभिनंदन केले आहे.

तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य -

- शाफ हे शत्रूच्या रडारच्या धोक्यापासून वाचविणारे अत्यंत महत्त्वाचे संरक्षण तंत्रज्ञान

- ‘इन्फ्रा-रेड आणि रडार यांच्या धोक्याला अप्रत्यक्षपणे पायबंद घालणारी सीएमडीएस प्रणालीचा वापर

- अत्यंत कमी प्रमाणात वापरलेले शाफचे साहित्य हवेत असताना शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशाभूल करण्यासाठी उपयुक्त ठरते

- यामुळे लढाऊ विमानांचे संरक्षण करणे शक्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT