Prithviraj-Chavan
Prithviraj-Chavan 
पुणे

मोदींकडून देशाचा अवमान - पृथ्वीराज चव्हाण

सकाळवृत्तसेवा

पुणे - पाकिस्तानवरील हल्ल्याने भारतीय लष्कराबाबत अभिमान व्यक्त होत आहे. मात्र, या हल्ल्यासाठी चांगली विमाने असती, तर परिस्थिती निराळी असती, असे विधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा अवमान केला आहे. त्यामुळे मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या हल्ल्याचे भाजप आणि मोदी राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केल्याच्या पार्श्‍वभूमीवर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसची भूमिका मांडली. चव्हाण म्हणाले, ‘‘भारत-पाकिस्तान यांच्यातील हल्ल्यांत भारतीय जवान हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव आणले जात असताना; मोदी मात्र राजकीय डाव करीत होते. हवाई दलाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याऐवजी मोदी विमानाच्या दर्जाबाबत बोलत राहिले. म्हणजेच एक प्रकारे हवाई दलाच्या जवानांची कामगिरी कमकुवत असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. 

हा देशाचा अवमान आहे. मोंदीचे विधान निंदनीय आहे. त्याबाबत संतप्त भावना निर्माण झाल्या असून, या प्रकरणाचे राजकारण मोदींनी थांबवावे.’’

भाजप सरकारांमुळेच राफेल विमान खरेदीला आठ वर्षे विलंब झाल्याचा ठपका ठेवत चव्हाण म्हणाले, ‘‘भारतीय हवाई दलासाठी १२६ विमानांची आवश्‍यकता होती. त्याकडे दुर्लक्ष करून या सरकारने केवळ ३६ विमाने खरेदी केली आहेत. केवळ अंबानी यांच्या फायद्यासाठीच सरकारने कमी विमाने घेतली आहेत.’’ देशाची सुरक्षितता, भारतीय लष्कर याबाबत काँग्रेस राजकारण करीत नसल्याचा दावा त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT