pune
pune 
पुणे

Loksabha 2019 : मोहन जोशी यांच्याकडे पावणेसात कोटींची संपत्ती

सकाळवृत्तसेवा

पुणे : विधान परिषदेतील माजी आमदार आणि लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांची कौटुंबिक संपत्ती सुमारे पावणेसात कोटी रुपये आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जोशी यांनी दिलेल्या शपथपत्रात कौटुंबिक संपत्तीचा उल्लेख केला आहे.

जोशी यांच्याकडे जंगम मालमत्ता 67 लाख 47 हजार रुपये असून, त्यांच्या
पत्नीच्या नावे 26 लाख 72 हजार रुपये इतकी आहे. त्यामध्ये दागिने, वाहन,
बँकेतील बचत खात्यातील रक्‍कम यांचा समावेश आहे. जोशी यांच्याकडे एक लाख 72 हजार 380 रुपयांची रोकड तर, पत्नीकडे एक लाख 44 हजारांची रोकड आहे.

बँकेमधील बचत खात्यात एकूण आठ लाख 85 हजार रुपये तर, पत्नीच्या नावे दोन लाख 66 हजार रुपये आहेत. वाहनांच्या ताफ्यात टोयाटो इनोव्हा आणि क्रेस्टा या दोन गाड्या आहेत. सध्या बाजारभावानुसार त्यांची किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे 127 ग्रॅम सोन्याचे दागिने असून, त्याची किंमत 3 लाख 61 हजार रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे 440 ग्रॅम सोन्याचे दागिने असून, त्याची किंमत सुमारे 13 लाख 61 हजार रुपये इतकी आहे. जोशी यांची कौटुंबिक स्थावर मालमत्ता सुमारे पाच कोटी 80 लाख रुपये इतकी आहे. त्यात मुळशी तालुक्‍यात अर्धा एकर जमीन असून, त्याचे बाजारभावानुसार मूल्य सात लाख रुपये आहे. याशिवाय, पुण्यातील शुक्रवार पेठ आणि मुंबईतील अंधेरी येथे दोन सदनिका आहेत. त्यांचे मूल्य सुमारे एक कोटी 53 लाख रुपये आहे. तर, पत्नीच्या नावे सोपानबाग येथील सदनिकेची किंमत सुमारे 3 कोटी 40 लाख रुपये आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT