पुणे

विधिमंडळ अधिवेशनात मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामासाठी दोन कोटीचा निधी मंजूर आमदार खरे

CD

राजू खरे MOH26B03279

मोहोळमधील मागास वस्त्यांसाठी दोन कोटी

विधिमंडळ अधिवेशनातून निधी मिळाल्याची आमदार खरे यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. २४ ः विधानसभा मतदार संघात मागासवर्गीय वस्तीसाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. अशी माहिती मोहोळचे आमदार राजू खरे यांनी दिली.
या बाबत आमदार खरे यांनी समाज विभाग कल्याण विभागाचे मंजुरीचे पत्र प्रसार माध्यमाकडे सादर केले आहे. या पत्रानुसार कोन्हेरी येथे मागासवर्गीय वस्तीत संविधान सभागृह बांधण्यासाठी दहा लाख, आंबे (ता पंढरपूर) येथे दलित वस्तीत पेविंग ब्लॉक बसविणे दहा लाख, पोहरगाव येथे नवबौद्ध घटक स्मशानभूमी काँक्रिट रस्ता दहा लाख, ढोक बाभूळगाव आंबेडकर नगर येथे समाज मंदिर बांधणे दहा लाख, डिकसळ येथे दलित स्मशान भूमीत वॉल कंपाउंडसाठी दहा लाख, कोरवली भीमनगर भूमीगत गटारसाठी दहा लाख, डिकसळ येथे मागास वर्गीय स्मशानभूमीत वॉल कंपाउंड, पाटकूल आंबेडकर नगर येथे संविधान सभागृहासाठी दहा लाख, खंडाळी समाज मंदिर वॉल कंपाउंड, सय्यद वरवडे दलित वस्तीत संविधान सभागृह, फूल चिंचोली (ता पंढरपूर) नागनाथ प्रक्षाळे ते वसंत बनसोडे घर रस्ता काँक्रिटीकरण, जामगाव बु, स्मशानभूमी वॉल कंपाउंड, टाकळी सिकंदर येथे बौद्ध विहार बांधणे, चळे (ता. पंढरपूर) येथे भीमराव मोरे घरापर्यंत काँक्रिट रस्ता करणे, चळे येथे कल्याण अंकूर शाळा ते कोयना नगर रोड येथे काँक्रिट रस्ता करणे, औढी आंबेडकर नगर येथे काँक्रिट रस्ता करणे, नजीकपिंपरी दलित वस्तीमध्ये सभागृह बांधणे, चिखली जयद्रत गवळी घर ते बोद्ध विहार येथे काँक्रिट रस्ता करणे, आढेगाव भीम नगर येथे भूमिगत गटार बांधणे अशा कामासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये या प्रमाणे सामाजिक न्याय सहाय्य विभाग यांच्या वतीने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT