पुणे

मोहोळ शहराच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे

CD

लोगो : विशेष मुलाखत
---
MOH26B03267
सिद्धी वस्त्रे
---
पाणी, रस्ते अन्‌ सुरक्षित मोहोळ शहरासाठी ठोस उपाययोजना
नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे; ओपन जिमपासून सीसीटीव्हीपर्यंत विकास आराखड्याची रूपरेषा स्पष्ट
राजकुमार शहा : सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. २० : संपूर्ण राज्यात सर्वांत कमी वयाच्या नगराध्यक्षा म्हणून मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांनी मान मिळवला आहे. मात्र, मोहोळ शहर व हद्दवाढ भागात ढीगभर समस्या आहेत. त्यात शहराचा पाणीपुरवठा, शहरात येणारा मुख्य रस्ता, क्रीडा संकुल, बसस्थानक, अग्निशामक गाडी या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत; त्या सोडविण्याचे मोठे आव्हान नगराध्यक्षा वस्त्रे यांच्यासमोर आहे. मात्र, शहरातील या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहणार असल्याचे नगराध्यक्षा वस्त्रे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
---
१. शहर सुधारण्यासाठी पाच वर्षांचे काय व्हीजन आहे?
- नगरपरिषद निवडणुकीवेळी जो आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्याची पूर्तता करण्याचे काम सुरू केले आहे. रस्ते, गटारी याला तर प्राधान्य आहेच; परंतु वृद्ध नागरिकांना ओपन जिम, वॉकिंग स्ट्रीट, लहान मुलांसाठी प्ले-ग्राउंड, युवकांसाठी बॅडमिंटन टफ या कामांसाठी पुढाकार घेतला आहे. जसा निधी उपलब्ध होईल तशी ही कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत.
---
२. शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करणार?
- मोहोळ शहराचा विस्तार मोठा आहे. वरचेवर शहरीकरण वाढत आहे. शहरातील काही मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर एसओएस प्रणाली कार्यान्वित करणार आहोत. एसओएस म्हणजे शहरातील एखाद्या भागात काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तर ती परिस्थिती नगरपरिषदेत दिसते, त्याचे स्ट्राँगरूम हे नगरपरिषदेत असणार आहे; जेणेकरून त्या ठिकाणी बसून उपाययोजना करता येईल अथवा पोलिसांशी संपर्क साधता येईल.
---
३. पाणी टंचाईबाबत काय उपाययोजना करणार आहात?
- गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न शहरवासीयांना भेडसावत आहे. त्यावर काम सुरू आहे. सध्या पाणीटंचाई नाही, परंतु भविष्यात पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ नये यासाठी ओढा खोली व रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. कारण, शहरात बोअरची संख्या मोठी आहे. ओढा खोलीकरणामुळे परिसरातील बोअरची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.
---
४. शहरांतर्गत रस्त्यांसाठी काय उपाययोजना करणार आहात?
- शहरात येणारा मुख्य रस्ता तसेच सीमोल्लंघन पाणंद रस्ता हे शहरातील मुख्य रस्ते आहेत. त्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या मधोमध असणारे विद्युत खांब एका बाजूला घेऊन भूमिगत तारा टाकण्याचेही नियोजन आहे, जेणेकरून सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले होईल. महात्मा फुले भाजी मंडईचे काम सुरू आहे. त्याचा पाठपुरावा करून ते लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरातील हद्दवाढ भागात अभ्यासिकेसाठीची जागा अंतिम झाली आहे. लवकरच ते काम सुरू होणार आहे.
---
५. आग नियंत्रणासाठी अग्निशामक गाडीसाठी काय पाठपुरावा करताहात?
- सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. या अगोदर शहरात आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा वेळी शहर परिसरातील साखर कारखाने व इतर नगर परिषदांच्या अग्निशामक गाड्यांवर अवलंबून राहावे लागते. मोहोळ शहरासाठी अग्निशामक गाडी मंजूर आहे, ती येत्या महिनाभरात कशी आणता येईल यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
---
६. सध्या कुरुल रोड परिसरातून तक्रारींचे प्रमाण वाढते आहे.
- विजयपूरला जाणारा महामार्ग शहरातून जातो. तो रस्ता मोठा केला तर अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेशी बोलणे झाले आहे. त्यावर लवकरच उपाययोजना सुरू करणार
आहोत. नागरिकांसाठी दररोज संपर्क असल्याने त्यांच्या तक्रार निवारणासाठी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंतचा वेळ देण्यात येत आहे. अनेक तक्रारी मोबाईलवर येतात. त्या तक्रारी त्या त्या प्रभागांच्या नगरसेवकांकडे पाठविल्या जातात. ते उपलब्ध नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT