shaniwarwada pune Sakal
पुणे

पुणे : शनिवारवाड्यासह जिल्ह्यातील पुरातत्त्व विभागाची स्मारके खुली

पुणे जिल्ह्यातील शनिवारवाडा, आगाखान पॅलेससह पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडील स्मारके पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.

प्रशांत पाटील

पुणे - जिल्ह्यातील शनिवारवाडा, आगाखान पॅलेससह पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडील स्मारके पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे पुणे जिल्ह्यातील पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील स्मारके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडील स्मारके नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये शनिवारवाडा, आगाखान पॅलेससह पुरातत्त्व विभागाच्या स्मारकांचा समावेश आहे. परंतु वन विभागाच्या अखत्यारीतील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंदच राहणार आहे.

दरम्यान, पर्यटकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. शारीरिक अंतर राखण्यासोबतच मास्क परिधान करणे बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पुरातत्त्व विभागाच्या कार्यक्षेत्रातील स्मारके नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शनिवारवाडा, आगाखान पॅलेससह इतर स्मारकांचा समावेश आहे.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT