पुणे

शिरुर उपविभागात दोन हजारा पेक्षा अधिक रोहित्र बंद

सकाळ वृत्तसेवा

रांजणगाव सांडस : विज बिल थकल्याने महावितरण शिरूर उपविभागातील सुमारे दोन हजारापेक्षा अधिक थ्रीफेज रोहित्राचा वीजपुरवठा गुरुवार (ता.१८)पासून बंद केला आहे .सुमारे तीनशे कोटी पेक्षा अधिक रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने ही धडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, महावितरणच्या या कारवाईचा शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणगाव सांडस, नागरगाव, वडगाव रासाई, मांडवगण फराटा ,सादलगाव, आलेगाव पागा आदी गावातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.कारण भीमा, मुळा-मुठा नदी पात्रात पाणी असूनही विजेअभावी ते देता येत नसल्यामुळे पिके जाण्याची भीती निर्माण झाली आहे .सद्यस्थितीत ढगाळ वातावरण संपून उन्हाची तीव्रता वाढत आहे.त्यामुळे पिके सुकू लागली आहेत.परंतु वीज नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे .अनेक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला गेला नाही .त्यामुळे पैशाची तरतूद कोठून करायची व विज बिल कुठून भरायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.

दर तीन महिन्याला शेतकऱ्यांना वेठीस धरून विज बिल वसुलीसाठी ट्रांन्सफार्मरचा वीज पुरवठा बंद केला जात आहे .वास्तविक वीज कंपनी आठ तास वीज पुरवठा करत असताना २४ तासाचे अंदाजे वीज बिल देत आहे .सध्या परिस्थिती कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.शेतीमालाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकरी हतबल आहेत .वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टाळणे गरजेचे आहे. कंपनीच्या वीज बिलामध्ये आकारणी करताना ताळमेळ राहिला नाही .पाठी मागील तीन महिन्यापूर्वी दहा एचपीचे भरलेले बिल यावेळेस वीस एचपीचे आकारण्यात आले आहे. वीजपुरवठा सुरळीत सुरु न केल्यास शेतकरी महावितरण विरोधात मोठे आंदोलन करतील.

सुभाष ढवळे शेतकरी,

वडगाव रासाई (ता.शिरूर).

महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट रोहित्राचा वीजपुरवठा खंडित केला आहे .त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नियोजन कोलमडले आहे. उन्हाचे चटके आधीक जाणवत आहेत. मात्र वीज नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे .वसुलीसाठी शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे गरजेचे आहे. संभाजी रणदिवे, संतोष लोखंडे - शेतकरी रांजणगाव सांडस( ता. शिरूर). कोट: कृषीमूल्य आयोगाच्या शिफारशीत शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाच्या खर्चात वीज बिलाचा समावेश करण्यात आलेला नाही .त्यामुळे शेतकरी बिल भरणार नाहीत. एकीकडे शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसताना वसुलीचा हा तगादा योग्य नाही .

माजी सरपंच प्रशांत सात्रस,

अध्यक्ष - उरळगाव विविध कार्यकारी सोसायटी(ता.शिरूर ).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT