Pune-Municipal sakal
पुणे

बाणेरमधील सर्वाधिक भूखंड येणार लिलावात

मध्यवर्ती पुण्यात जागाच शिल्लक नाही

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : महापालिकेने शहरातील ॲमेनिटीचे स्पेस भाड्याने देण्यासाठी तयार केलेल्या यादीत सर्वाधिक बाणेर भागातील ४२ भूखंड लिलावात असणार आहेत. त्याच बरोबर खराडीतील २८, कोंढव्यातील २७, बालेवाडीतील २३, वडगाव बुद्रूक १९ जागांचा यामध्ये समावेश आहे. यानिमित्ताने मध्यवर्ती पेठांमध्ये एकही ॲमेनिटी स्पेस रिकामी नसल्याचे समोर आले आहे. (Pune News)

पुणे महापालिकेने शहरातील २६९ ॲमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला आहे, यावर गुरुवारी (ता. २६) मुख्यसभेत अंतिम निर्णय होणार आहे. या ॲमेनिटी स्पेस ३० वर्षासाठी भाड्याने देताना त्यांचा एकरकमी भाडे भरून घेतल्याने महापालिकेस १७५३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, त्यातून विकासाचे प्रकल्प मार्गी लावता येतील असा दावा केला जात आहे. मात्र, शहरातील सामाजिक संस्था, संघटनांनी विरोध केला आहे, त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तर महापालिकेतील विरोधी पक्षांची सध्या विरोधाचा सूर लावलेला आहे. त्यामुळे हा विषय वादात सापडलेला आहे.

खासगी संस्था, व्यावसायिकांना दीर्घ मुदतीने देण्यात येणारे हे भूखंड उपनगरांमध्ये असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने दोन याद्या केल्या असून, एक यादी १८४ ॲमेनिटी स्पेसची आहे. तर दुसरी ८५ आरक्षणाच्या जागांची यादी आहे. गेल्या काही वर्षात सर्वाधिक नविन बांधकामे उपनगरांमध्ये झालेले आहेत. १९८७ च्या विकास आरखड्यात दाखविलेली आरक्षणे तसेच ॲमेनिटी स्पेसच्या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. त्यापैकी महापालिकेने ५५६ जागांचा विकास केला आहे. तर शहराच्या विविध २२ भागातील २६९ जागा या रिकाम्या असल्याने त्यांचा लिलाव करून भाड्याने दिल्या जाणार आहेत. पहिल्या पाच मध्ये बाणेर ४२, खराडी २८, कोंढवा २७, बालेवाडी २३, वडगाव बुद्रूक १९ या जागांचा समावेश आहे. तसेच आंबेगाव ११, बावधन खुर्द १२, धायरी ८, हडपसर १७, हिंगणे ३, कोथरूड ४, एरंडवणा १, लोहगाव १४, महंमदवाडी १४, मुंढवा ९, पाषाण ९, उंड्री ३, वडगाव शेरी ४, वारजे १, येवलेवाडी ८, कात्रज ६, धानोरी १ या भागात जागा आहेत,अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

एकूण जागा १२३ एकर

महापालिकेने २६९ ॲमेनिटी स्पेस भाड्याने देण्यासाठी तयार केलेल्या यादीत काही भूखंड अर्धा एकर पेक्षा मोठे आहेत. यामध्ये १८५ ॲमेनिटी स्पेसचे क्षेत्र ५४ एकर इतके आहे. तर आरक्षणाच्या ८५ भूखंडांचे क्षेत्र ६७ एकर इतके आहे, यामध्ये खराडीतील तीन जागा एक एकरपेक्षा मोठ्या आहेत. तर वडगाव शेरी येथील एक जागा दोन एकर पेक्षा जास्त आहे, या जागेचे क्षेत्रफळ २४ हजार ३३३ चौरस मिटर आहे. या चारीही जागांवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT