crime_wome.jpg
crime_wome.jpg 
पुणे

जेवण कमी पडल्याने आईसह भावाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : घरी जेवण करत असताना कमी जेवण पडल्याने मुलाने आईसह भावाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री कोंढवा येथे घडली. याप्रकरणी उच्चशिक्षित मुलाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रवी चंद्रकांत सरतापे (वय 30, रा. कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रकांत सरतापे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी चंद्रकांत सरतापे हे संशयित आरोपी रवीचे वडील आहेत. रवीचे बीबीए पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तो अविवाहीत असून सध्या एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो.

नेहमीप्रमाणे रविवारी रात्री तो उशीरा कामावरुन घरी आला. त्यानंतर जेवण करण्यासाठी बसला. तोपर्यंत रविची आई झोपली होती. दरम्यान, त्यास जेवण कमी पडले. त्यामुळे त्याने चिडून आईला झोपेतून उठविले. त्यानंतर तिच्याशी वाद घालून आईस बेदम मारहाण केली. दरम्यान, त्याच्या मोठ्या भावाने आईची सुटका करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी रवीने त्यालाही मारहाण केली. या घटनेमध्ये रवीची आई गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर कोंढवा पोलिसांनी त्यास तत्काळ अटक केली असून न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT