Mothers-Day
Mothers-Day 
पुणे

Mother's Day : लक्ष तिचं पंखांत बळ भरण्याकडं ...

मीनाक्षी गुरव

आई... दोन अक्षरांचा महिमा गावा तेवढा कमीच... मुलाला जन्माला घालण्यापासून ते त्याला लहानाचा मोठा करून तो पायावर उभा राहिला तरी मायेची सावली म्हणून वावरत असते ती... आज जगण्यासाठी लढाई, संघर्ष, रात्रीचा दिवस करीत तळहातावरील फोडाप्रमाणे ती जपते आपल्या मुलाबाळांना. घरात आणि घराबाहेर अशा दोन आघाड्यांवर लढतानाही तिचे लक्ष असते ते त्यांच्या पंखांत बळ भरण्याकडे, जगाच्या गर्दीतही तो कुठे मागे पडू नये, यासाठी ती असते झुंजत. आजच्या मातृ दिनानिमित्ताने अशा झुंजणाऱ्या माता परिस्थितीशी दोन हात करीत प्रगतीची शिखरे गाठत आहेत.

शिक्षणासाठी पाठबळ
पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. वैशाली चांदणे यांनी आपल्या आईच्या आठवणींना यानिमित्ताने उजाळा दिला. त्यांच्या मातुःश्री गुलाबबाई चांदणे मूळच्या सोलापूरमधील. जेमतेम आठवीपर्यंतचे शिक्षण असतानाही आपल्या पोरींनी शिक्षण घ्यावे, असे त्यांचे स्वप्नं. म्हणूनच मुलांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घ्यावे, अशी मुभा त्यांनी दिली. समाजातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तू कायद्याचे शिक्षण घे. येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तू सदैव तयार असायला पाहिजे, असे आई नेहमी म्हणायची. तिने रुजविलेल्या संस्कारांचे बीज आता वृक्षात रूपांतरित होत आहे. तिच्यामुळेच मी वकील होऊ शकले, असे ॲड. चांदणे यांनी सांगितले. २०१३ मध्ये मातृछत्र हरपले, तरीही तिने दिलेल्या संस्कारांमुळे जगणं सुकर होतंय, असेही ॲड. चांदणे यांनी नमूद केले.

मातृत्वाचा समान धागा
घर असो वा शाळा शिक्षक हा दोन्हींकडे एका अर्थाने मातृत्वाचेच धडे देत असतो. घरामध्ये आई असणे आणि शाळेमध्ये शिक्षिका असणे, हे मातृत्वाच्या एका समान धाग्याने जोडले गेले आहे, असा अनुभव नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी सांगितला. त्या म्हणतात, ‘‘आमच्या घरात आम्ही सात बहिणी असतानाही, आईने आम्हांला खूप कष्टाने वाढविले. हलाखीची परिस्थिती असतानाही, तिने शिकण्यासाठी स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन दिले. स्वत: कष्ट केले आणि आम्हाला शिकविले. आईने कधी हाताला धरून शिकवले नाही, तर तिच्याकडे बघत-बघत शिकण्याची सवय तिने लावली. आईपासून ते आई होण्यापर्यंतच्या प्रत्येक प्रवासात तिने खंबीर साथ दिली. नोकरी आणि घर सांभाळताना अर्थातच तारेवरची कसरत काही चुकली नाही.’’ घरातील आणि शाळेतील मुलं घडविताना एक वेगळाच मातृत्वाचा अनुभव घेता असल्याचे समाधानही वाघ यांनी व्यक्त केले.

आई नव्याने उमगली
आईशी असणाऱ्या घट्ट नात्याविषयी बोलताना अभिनेत्री गिरिजा ओक म्हणाली, ‘‘वडिलांपेक्षा मी अधिक काळ आईजवळ राहिले आहे. त्यामुळे तिच्याशी असणारे नाते काही वेगळेच आहे. खरंतर मी स्वत: आई झाल्यावर आईकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. माझ्या मुलाला वाढविताना आई नव्याने कळत गेली. मुलाला सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत असली, तरीही माझा मुलगा आणि काम या दोघांवर माझे प्रेम आहे. कामामुळे माझी धावपळ होत असते; परंतु मुलाला मी कायम प्राधान्य देते. जेवढ्या उत्साहाने मी मुलाकडे येते, तेवढ्याच उत्साहाने कामालाही पुन्हा सुरवात करते. सुरवातीपासून मुलगा समजूतदार आहे. घरातील प्रत्येकाचे क्षेत्र हे धावपळीचे असले, तरीही तो प्रत्येकाशी मस्तपैकी जुळवून घेतो. मुलाला आणि आईला एकत्र पाहून चांगले वाटते.’’

शेतीची धुरा शिरावर
सणसर येथील इंदापूर पंचायत समितीच्या माजी सदस्या असलेल्या सुवर्णा निंबाळकर या आपल्या कुटुंबाबरोबरच ५५ एकर शेतीचे व्यवस्थापन सांभाळत आहेत. पती बाळासाहेब निंबाळकर यांच्यासह त्या शिंदेवाडी-काझड येथील ५५ एकर शेतीचे व्यवस्थापन पाहायचे. बाळासाहेब यांचे शेतातच अपघाती निधन झाले. त्यांच्यानंतर सुवर्णा यांनी दुःख बाजूला ठेवून शेतीची धुरा खांद्यावर घेतली. ‘‘मुलांनी शिकूनसवरून मोठे व्हावे; पण शेतकरी म्हणून असलेला पिंड कायम राहावा, असे शिक्षण त्यांना देते,’’ असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT