Dr. Amol Kolhe
Dr. Amol Kolhe sakal media
पुणे

गोडसेची भूमिका केल्यानं अमोल कोल्हेंकडून आळंदीत आत्मक्लेश!

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : 'व्हाय आय किल्ड गांधी' (Why I Killed Gandhi) या चित्रपटात नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका साकारल्यानं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सध्या मोठ्या प्रमाणावर टीकेची धनी झाले आहेत. याप्रकरणावरुन काही दिवसांपूर्वी मोठा राजकीय गदारोळ माजला होता. याच पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी आळंदी इथं आत्मक्लेश केला. (MP Amol Kolhe self tribulation in Alandi for playing role of Nathuram Godse)

कोल्हे म्हणाले, "सन २०१७ मध्ये मी 'व्हाय आय किल्ड गांधी' नावाचा सिनेमा केला होता. जो आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील माझ्या भूमिकेबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यापेक्षाही मला जास्त महत्वाचं हे वाटतं की अनेकांनी मला व्यक्तीशः ही गोष्ट सांगितली की, आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्याही रुपात स्विकारलं. पण आता तुम्हाला या भूमिकेत बघणं आम्हाला पसंत पडलेलं नाही. त्यांच्या विचारांना धक्का लागल्याची नाराजी अनेक युवा कार्यकर्त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केली"

"२०१७ साली अजाणतेपणानं ही गोष्ट झाली. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांच्याबद्दल मी नक्कीच दिलगीरी व्यक्त करतो. कारण जी भूमिका मी केली त्या विचारधारेचं समर्थन मी कधीही केलंल नाही आणि करणार नाही हे मी यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे. यानंतर नैतिकतेच्या दृष्टीकोनातून जी भूमिका मी भविष्यात घेईन ती आपल्यासमोर मी व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच मांडणार आहे. कुठेही ज्या युवापिढीनं माझ्यावर हा विश्वास दाखवला त्यांच्या मनात देशाच्या इतिहासाविषयी, राष्ट्रपित्याविषयी एक संशयाचं वातावरण निर्माण होऊ नये असं मला वाटतं" असंही कोल्हे यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT