Shivsainik sakal
पुणे

Manchar News : डॉ. कोल्हे यांनी देवदत्त निकम यांचा 'भावी आमदार' असा उल्लेख करताच ठाकरे शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून घातला गोंधळ

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मंचर (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (ता. ११) रात्री झालेल्या नागरी सत्कार सभेत महाविकास आघाडीतील वाद उफाळून आला.

डी. के. वळसे पाटील

मंचर - शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मंचर (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (ता. ११) रात्री झालेल्या नागरी सत्कार सभेत महाविकास आघाडीतील वाद उफाळून आला. डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांचा 'भावी आमदार' असा उल्लेख करताच संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यासपीठ सोडून खाली येऊन जोरदार घोषणाबाजी केली. झालेला गोंधळ पाहून डॉ. अमोल कोल्हे यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले.

दुसऱ्यांदा खासदार झाल्याबद्दल डॉक्टर कोल्हे यांची मंचर शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा सांगता समारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर व शिवसेनेचे संघटन राजाराम बाणखेले यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातील एकूण सहा जागांपैकी किमान दोन जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला मिळाव्यात. त्यामध्ये आंबेगावच्या जागेचा समावेश असावा. अशी जाहीर मागणी केल्यानंतर उपस्थित ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजून घोषणाबाजी केली.

या पार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे बोलत असताना २०१९ च्या व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देवदत्त निकम यांनी उत्कृष्ट नियोजन केले. त्यांचे संघटन कौशल्य फार चांगले आहे. असे सांगत असतानाच “भावी आमदार देवदत्त निकम”असा उल्लेख केला. त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षातील कार्यकर्ते नाराज झाले.

सुरेश भोर, राजाराम बाणखेले, दत्ता गांजाळे, दिलीप पवळे, सुरेखा निघोट यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावरून पायउतार झाले. त्यांनी जय भवानी, जय शिवाजी, उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबादच्या घोषणा सुरू केल्या. व्यासपीठा शेजारीच गोंधळ झाल्याने डॉ.कोल्हे यांनी आपले भाषण आटोपते घेतले. शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे हे कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या.

त्यानंतर डॉ. कोल्हे कार्यकर्त्याजवळ आले. विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार डॉ.कोल्हे यांना कोणी दिला. अशी संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात येत होती. सुरेश भोर, राजाराम बाणखेले, अनिल निघोट आक्रमक झाले होते.

'डॉ. कोल्हे यांच्या विजयासाठी आम्ही जिवाचे रान केले, त्यांच्या विजयामध्ये सर्वात पुढे शिवसैनिक होता. आम्ही छातीवर विरोधकांचे वार घेतले आहेत. विधानसभेचा जागेचा फॉर्मुला अजून जाहीर न होताच निकम यांची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार डॉ. कोल्हे यांना कोणी दिला. असा संतप्त सवाल राजाभाऊ बानखेले यांनी केला.

याबाबत डॉ. कोल्हे व बाळासाहेब बाणखेले सतत कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

'अजान चालू होती.त्यामुळे मी थोडा वेळ थांबलो. पुन्हा बोलायला लागलो. अनावधानाने मी भावी आमदार निकम असे म्हटलो माझे जर चुकले असेल तर मी माफी मागतो. गैरसमज करू नका.महाविकास आघाडी निर्णय घेईल. त्याप्रमाणेच उमेदवार जाहीर केला जाईल.त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवचे रान करील. महाविकास आघाडी एकसंघ ठेवावी.'

- डॉ. अमोल कोल्हे खासदार.

'मी जिल्हाप्रमुख आहे. माझ्यासह सर्व ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रात्रदिवस अंग झटून काम केले. प्रचारादरम्यान आमच्या कार्यकर्त्यांचा अनेकदा अपमान करण्यात आला. मतमोजणीला डॉ.कोल्हे यांचा पास देणेऐवजी मला एका अपक्ष उमेदवाराचा पास दिला.तो माझ्या पदाचा अवमान होता. त्यामुळे मी मतमोजणीला थांबलो नाही. पण माझ्याविषयी बदनामी करण्याचा प्रयत्न देवदत्त निकम यांनी केला. सतत आमचा अपमान केला जातो हे आम्ही यापुढे सहन करणार नाही.'

- सुरेश भोर, जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT