MP Supriya Sule esakal
पुणे

'खतांसोबत किटकनाशक खरेदीची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर तातडीनं कारवाई करा'; असं का म्हणाल्या खासदार सुळे?

शेतकऱ्यांना खतांसोबत किटकनाशक खरेदीची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

मिलिंद संगई

खासदार सुळे या सध्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन याबाबत आपली भूमिका मांडली.

बारामती : शेतकऱ्यांना खतांसोबत किटकनाशक खरेदीची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. किटकनाशक घेतले तरच खते मिळतील, असे म्हणून त्यांची अडवणूक केली जात आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधित दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे.

खासदार सुळे या सध्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन याबाबत आपली भूमिका मांडली. हे शेतकरी जेंव्हा रासायनिक खते आणण्यासाठी दुकानात जातात, तेंव्हा त्यांना खतासोबत किटकनाशक विकत घेण्याची सक्ती केली जाते. ते घेतले तरच खते देणार असे सांगितले जाते, ही बाब शेतकऱ्यांनी सुळे यांच्या लक्षात आणून दिली.

हा प्रकार लक्षात येताच खासदार सुळे यांनी लागलीच ट्विट करत, 'हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. शेतकऱ्यांना अशा प्रकारची जबरदस्ती कुणालाही करता येत नाही. तरीही त्यांची अशी पिळवणूक होत असेल तर ते चुकीचे आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून अशा दुकानांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत', अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT