पुणे

राज्यसेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय वगळला

CD

पुणे, ता. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या (गट-अ, ब) स्वरूपात मोठा बदल केला असून, २०२७ च्या परीक्षेपासून ‘वैकल्पिक विषय’ वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील इतर राज्यांच्या धर्तीवर मूल्यमापन पद्धतीत अधिक एकसमानता, प्रमाणबद्धता आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुख्य परीक्षेचे एकूण गुण १७५० वरून १२५०, तर मुलाखतीसह एकूण गुण २०२५ ऐवजी १५२५ इतके होणार आहेत.

आयोगाच्या परीक्षा नियंत्रक व सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ आणि ब अंतर्गत राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सध्या उमेदवारांना एका वैकल्पिक विषयाची निवड करावी लागते, ज्याचे प्रत्येकी २५० गुणांचे दोन पेपर (एकूण ५०० गुण) अनिवार्य होते. मात्र, आता २०२७ च्या मुख्य परीक्षेपासून हे दोन्ही पेपर वगळण्यात आले आहेत.
आयोगाच्या माहितीनुसार, तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश आणि बिहार यांसारख्या अनेक राज्यांच्या लोकसेवा आयोगांनी त्यांच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा पद्धतीतून वैकल्पिक विषय यापूर्वीच वगळले आहेत. त्याऐवजी अधिक एकसमान, प्रमाणित मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केला आहे. याच धर्तीवर सर्व बाबींचा विचार करून ‘एमपीएससी’नेही वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय घेतला.

या परीक्षांमध्ये बदल नाही
हा बदल केवळ राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी लागू केला आहे. मात्र, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेकरिता वैकल्पिक विषयांची तरतूद पूर्वीप्रमाणेच लागू राहील. तसेच, महाराष्ट्र स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी सेवा, कृषिसेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा आणि निरीक्षक वैधमापनशास्त्र या सर्व मुख्य परीक्षा प्रचलित योजनेनुसारच घेण्यात येतील; त्यांच्यात कोणताही बदल केला नसल्याचे आयोगाने सांगितले.

सुधारित परीक्षा योजना (२०२७ पासून)
भाषा पेपर १ (मराठी) : ३०० गुण
भाषा पेपर २ (इंग्रजी) : ३०० गुण
निबंध (मराठी किंवा इंग्रजी) : २५० गुण
सामान्य अध्ययन १ ते ४ (चार पेपर) : प्रत्येकी २५० गुण
वैकल्पिक विषय पेपर १ व २ (२६ विषय) : परीक्षेतून वगळण्यात आले
एकूण लेखी परीक्षा (पेपर ३ ते ७) : १२५० गुण
मुलाखत : २७५ गुण
अंतिम एकूण गुण (लेखी+मुलाखत) : १५२५ गुण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam Pattern: राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात मोठा बदल; वैकल्पिक विषय वगळला, पुढच्या वर्षीपासून अंमलबजावणी

Pune Kothrud theatre delay: कोथरूडमधील बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह १२ वर्षांपासून रखडले; भित्तीचित्रांसाठी तब्बल ६९ लाखांचा खर्च मंजूर

Ketan Agarwal Murder : केतन अग्रवाल खून प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नियुक्त

Takli Rajerai vet hospital crisis: टाकळी राजेराय पशुवैद्यकीय रुग्णालयात मनुष्यबळ व सुविधांचा अभाव; नऊ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात

Dangerous ZP School Building: टाकळी राजेराय जि.प. शाळेची धोकादायक इमारत; २०१७ पासून लोबकळता स्लॅब, विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरूच खेळ

SCROLL FOR NEXT