MPSC Exam Students do the damage to students 
पुणे

विद्यार्थीच करतात विद्यार्थ्यांचे नुकसान 

सम्राट कदम

पुणे : देशभरातील विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापकाची पात्रता किंवा पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती मिळविण्याकरिता राष्ट्रीय पात्रता परिक्षा (नेट) देतात. नेट परीक्षेत मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्तीसाठी (जेआरएफ) पात्र ठरतात. मात्र, दरवर्षी या परीक्षेला आधीच ‘मेरिट’मध्ये आलेले काही विद्यार्थी पुन्हा बसतात आणि पुन्हा मेरिटची जागा अडवतात. पर्यायाने जेआरएफसाठी प्रयत्न करणाऱ्या नव्या होतकरू विद्यार्थ्यांना संधीच मिळत नाही. कारण अशा विद्यार्थ्यांमुळे परीक्षेचे मेरिटच वाढून जाते. 

आपले मेरिटमधील रॅंकिंग वाढविण्यासाठी, दोन वेळा, दहा वेळा ‘जेआरएफ’ झालोत हे मिरविण्यासाठी बरेचसे हुशार विद्यार्थी नेटची परीक्षा देतात. नेट बरोबरच असा प्रकार बारावीनंतर व्यावसायीक अभ्यासक्रमांसाठीच्या पात्रता परिक्षा, जसे की जेईई, नीट आदींमध्ये होते. 

साध्या वेषात जॅकी श्रॉफ पोहोचला मावळात; घरकाम करणाऱ्या तरुणीचं केलं सांत्वन

राजेश राघव (नाव बदललेले) सांगतो, ‘‘सीएसआयआरच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेत माझे दोन मित्र जेआरएफमध्ये पहिल्या शंभरात येऊनही त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. त्यांना अधिक पुढची रॅंकिंग हवी होती. तर एका खासगी क्लासचे शिक्षक दरवर्षी नेट देतात आणि जेआरएफ मिळवितात. मात्र, ते संशोधन करत नसल्यामुळे ती जागा रिक्त राहते.’’ विद्यापीठ अनुदान आयोग आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) यासंबंधी नियम करायला हवेत, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. 


संशोधनाचे नुकसान 
- शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी ठराविक ‘कोटा’ असतो 
- पात्र ठरूनही पुन्हा परीक्षा देणाऱ्यांमुळे कोट्यातील जागा व्यापली जाते 
- पर्यायाने नव्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या जागा कमी होतात 
- इतर विद्यार्थ्यांचे नुकसान तर होतेच त्याचबरोबर संशोधन संस्थांनाही पात्र विद्यार्थी मिळत नाही 
- अनेकदा परीक्षा देणारे बरेचशे परीक्षार्थी हे महाविद्यालये किंवा खासगी क्लासेसमध्ये शिकवत असतात 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रीय पात्रता परीक्षा (२०२०) 

परीक्षा घेणारी संस्था----परीक्षेला बसलेले विद्यार्थी----पात्र विद्यार्थी--पुन्हा परीक्षा देणारे (अंदाजे) 
१) यूजीसी (नेट जेआरएफ) ः ३,८६,२२८ ः ६,१७१ ः १० ते १४ टक्के 
२) सीएसआयआर (नेट जेआरएफ) ः १,२३,०९५ ः २,११५ ः १५ ते १९ टक्के 
३) नीट (व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी) १३,६६,९४५ ः ७,७१,५०० --उपलब्ध नाही 


विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी हवी असलेली संशोधन संस्था किंवा मार्गदर्शक मिळविण्यासाठी ‘जेआरएफ’मध्ये मिळालेली रॅंकिंग पुरेशी नसते. अशा वेळी हे विद्यार्थी पुन्हा परीक्षा देतात. जर पीएच.डी.साठी प्रत्येक मार्गदर्शकाला विद्यार्थ्यांना घेण्याचा संख्येबद्दल स्वातंत्र्य देण्यात आले, तर हा प्रश्न काही अंशी मिटेल. 
- डॉ. भागवतुला प्रसाद, अध्यक्ष, विद्यार्थी शैक्षणिक कार्यालय, एनसीएल, पुणे 

Video: कोरोना लस घेतल्यानंतर काय होतं? वाचा ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव

बहुतांश विद्यार्थी सेट, नेट सारख्या परीक्षांमध्ये मेरिटमध्ये येऊनही प्रसिद्धीसाठी पुन्हा पुन्हा परीक्षा देतात. काही विद्यार्थ्यांचे स्वप्न असते चांगली संस्था मिळावी, हे योग्य आहे. मात्र, प्रसिद्धीसाठी असे केल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. 
- प्रा. अजिंक्य भोर्डे, श्री आनंद महाविद्यालय, पाथर्डी, नगर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT