the MPSC result yet not declared Even after eight months
the MPSC result yet not declared Even after eight months 
पुणे

आठ महिने झाले तरी, निकाल लागेना; एमपीएससीचा ढिम्म कारभार!

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने गट क च्या पदांची भरती सुरू केली, त्याची परीक्षा होऊन आठ महिने होऊन गेले तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोगाने (एमपीएससी) निकाल जाहीर केलेला नाही.रखडलेले निकाल वेळेत लावावेत यासाठी राज्य सरकारने एमपीएससीला गतीने कारभार करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स संघटनेने केली आहे. 

८ महिन्यापासून गट - क सेवा पदांचा निकाल रखडलेला आहे. विद्यार्थी संभ्रम मध्ये आहेत. आयोगाने निकाल घोषित करावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, आयोगाचे सचिव आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे सतत प्रश्नांची दखल घेणारे लोकप्रतिनिधी मा.रोहित दादा पवार यांना पत्र लिहिण्यात आले आहे.


 पुण्यात नक्की चाललंय तरी काय; उपचाराअभावी तडफडताहेत कोरोना रुग्ण!​

राज्य सरकारने १६ एप्रिल २०१९ रोजी गट क च्या रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा केली. त्यामध्ये दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (३३ जागा), कर सहायक (१२६), लिपीक-टंकलेखक (१७९) या पदांसाठी १६ जूनला पूर्व परीक्षा घेतली. त्याची निकाल  २७ आॅगस्टरोजी जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, यातूनच  निवड झालेल्यांची मुख्य परीक्षा ही संयुक्त पेपर- १ (६ ऑक्टोबर), लिपिक-टंकलेखक पेपर- २ (१३ ऑक्टोबर), दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पेपर -२ (२० ऑक्टोबर), कर सहायक पेपर- २ (३ नोव्हेंबर) या तारखांना परीक्षा झाल्या आहेत.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यानंतर दोन तीन महिन्यात निकाल लागणे आवश्यक होते, पण परीक्षा होऊन जवळपास आठ महिने झाले आहेत. तरीही कोणतीही प्रक्रिया सुरू नाही. रखडलेल्या प्रक्रियेमुळे विद्यार्थी संभ्रम आहेत. पालक देखील आपल्या पाल्याला निकाल बाबत वारंवार विचारपूस करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांसमोर पुढील नियोजन करताना अडचण येत आहे. हजारो विद्यार्थ्यांसमोर  त्यांच्या भविष्याचा विचार आहे. याबाबत विद्यार्थी हित लक्षात घेता, लवकरात लवकर निकाल प्रकशित करण्यात यावा, अशी मागणी संघटनेचे प्रतिनिधी किरण निंभोरे यांनी केली आहे. 


''एमपीएससीने वेळेवर निकाल लावले तर विद्यार्थ्यांना पुढच्या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी नियोजन करता येते. रखडलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांचा संयम सुटत आहे. यासाठी एमपीएससीने कामात सुधारणा केली पाहिजे. निकाल लावण्यासाठी अामदार रोहित पवार यांच्याकडेही मागणी केली आहे.''
- महेश बडे, प्रतिनिधी, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT