Mahavitaran_Meter_Reading 
पुणे

वीजमीटर रिडींग पाठविण्यासाठी महावितरणने वाढवली मुदत; आता २४ तास नव्हे तर...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महावितरणकडून प्रत्येक महिन्याला वीजग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेण्यात येत आहे. मात्र, ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्याची सुविधा देखील महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूर्वी २४ तासांची असलेली ही मुदत आता पाच दिवसांच्या कालावधीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

महावितरणकडून केंद्रीकृत वीजबिल प्रणाली (सेंट्रलाईज बिलिंग सिस्टीम) सुरू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्‍चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रिडिंगसाठी निश्‍चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद करण्यात येते. त्यामध्ये मीटर क्रमांक देखील नमूद असतो. रिडींगच्या या निश्‍चित तारखेच्या एक दिवसआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्याची सुविधा 'एसएमएस'द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा मेसेज मिळाल्यापासून पाच दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल ऍप किंवा वेबसाईटद्वारे रिडींग पाठविता येईल.

पूर्वी केवळ मीटर रिडींग न होऊ शकल्याने ग्राहकांना मेसेज पाठविले जात होते आणि रिडींगसाठी २४ तासांची मुदत देण्यात येत होती. मात्र आता दरमहा रिडींग पाठविण्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ग्राहकांनी मीटरचे केडब्लूएच (kWh) रिडींग आणि त्यानुसार रिडींगचा फोटो पाठविल्यास महावितरणकडून घेण्यात आलेल्या रिडींगऐवजी ग्राहकांनी पाठविलेल्या रिडींगनुसार बिल तयार केले जाणार आहे, असे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी कळविले आहे. 

असे पाठवू शकता मीटर रिडींग 
मीटर रिडींग पाठविण्यासाठी सर्वप्रथम महावितरण मोबाईल ऍप डाऊनलोड करणे तसेच मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत महावितरणकडे नोंदणी करणे आवश्‍यक आहे. महावितरण मोबाईल ऍपमध्ये 'सबमीट मीटर रिडींग'वर क्‍लिक केल्यास एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास ज्या क्रमांकाचे मीटर रिडींग पाठवायचे आहे. तो क्रमांक सिलेक्‍ट करावा. त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा. मीटर रिडींग घेताना वीजमीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रिडींगची संख्या आणि केडब्लूएच (kWh) असे दिसल्यानंतरच (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा.

त्यानंतर फोटोनुसार मेन्यूअली रिडींग ऍपमध्ये नमूद करावे व सबमीट करावे. मोबाईल ऍपमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रिडींग थेट सबमीट करता येईल. मात्र गेस्ट म्हणून मीटर रिडींग सबमीट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल. ज्या ग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईटवरून फोटो आणि मीटर रिडींग अपलोड करायचे आहे त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन आणि लॉगीन करणे आवश्‍यक आहे.

ग्राहकांना काय फायदे होऊ शकतात 
- मीटरकडे आणि रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. 
- वीजवापरावर नियंत्रण ठेवणे शक्‍य होईल. 
- रिडींगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. 
- मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. 
- वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. 
- रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT