पुणे

पुण्यात बुरशीविरोधी २८६६ इंजेक्शन ‘एक्सपायर्ड’

चार वैद्यकीय महाविद्यालयांतील स्थिती; ‘ससून’मधील ६०८ वायल्स वाया

योगिराज प्रभुणे

पुणे : म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराच्या पुण्यातील रुग्णांना दोन दिवस पुरेल इतका ‘अँम्फोटेरेसिन बी’ इंजेक्शनचा साठा राज्यातील चार वैद्यकीय महाविद्यालयात ‘एक्सपायर्ड’ झाला. मुदतबाह्य झालेल्या दोन हजार ८६६ इंजेक्शन्समध्ये ससून रुग्णालयातील ६०८ वायल्स आहेत.(mucormycosis amphotericin B injection Stock Pune expired in four medical colleges in Pune)

पुण्यात सध्या सहाशे रुग्णांची नोंद झाली आहे. त्यासाठी दरदिवशी हजार ते बाराशे इंजेक्शनची मागणी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमधून केली जाते. असे चित्र एकीकडे असतानाच दुसरीकडे पुण्याला दोन दिवस पुरेल इतका इंजेक्शनचा साठा ‘एक्सपायर्ड’ झाल्याची माहिती पुढे आली आहे.

कोणती इंजेक्शन्स मुदतबाह्य?

‘अँम्फोटेरेसिन बी’ यात चार प्रकारची इंजेक्शन्स येतात. त्यात ‘प्लेन अँम्फोटेरेसिन बी’, ‘अँम्फोटेरेसिन बी इमलशन’, ‘अँम्फोटेरेसिन बी लिपीड’ ‘लायफोसोमल अँम्फोटेरेसिन बी’ यापैकी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘प्लेन अँम्फोटेरेसिन बी’, आणि लायफोसोमल याचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे ही इंजेक्शन्स मुदतबाह्य झाली.

कधी खरेदी केली होती?

‘अँम्फोटेरेसिन बी’ या इंजेक्शनची मागणी २०१७ मध्ये ससून रुग्णालयाने केली होती. त्याचा पुरवठा २०१९ मध्ये करण्यात आला. ‘एचआयव्ही’च्या रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांना बुरशीजन्य आजार होण्याचा धोका असतो. त्यासाठी ही इंजेक्शन खरेदी केली होती.

कधी मुदतबाह्य झाली?

म्युकरमायकोसिसवरील जीवरक्षक असलेली ही इंजेक्शन्स २८ फेब्रुवारी २०२१ मध्ये मुदतबाह्य झाली. या इंजेक्शनचा पुरवठा झाल्यापासून त्याचा वापर करण्याची वेळ आली नाही. त्यामुळे वापराविना पडून राहिलेली ही इंजेक्शन तीन महिन्यांपूर्वी ‘एक्सपार्ड’ झाल्याची माहिती ससून रुग्णालयातून मिळाली.

आता पुढे काय?

इंजेक्शन होते त्यावेळी म्युकरमायकोसिसचे रुग्ण नव्हते. आता रुग्ण आहेत, तर इंजेक्शन नाहीत, अशी अवस्था झाल्याची खंत रुग्णालयातील डॉक्टरांनी वर्तविली. पण, मुदतबाह्य झालेल्या या महागड्या इंजेक्शनचा वापर पुन्हा करता येतो का, या बाबतची चौकशी संबंधित औषधनिर्माण कंपनीशी पत्रव्यवहार करून केली पाहिजे. तसेच, अन्न व औषध प्रशासनातर्फे या इंजेक्शनची गुणवत्ता तपासणी करण्याची आता गरज आहे. कंपनीने ही इंजेक्शन्स वापरण्यास हरकत न घेतल्यास आणि तसेच, ही इंजेक्शन्स दर्जेदार असल्याचे निर्वाळा अन्न व औषध प्रशासनाने प्रयोगशाळा तपासणीतून दिल्यास ही इंजेक्शन्स रुग्णांना वापरणे शक्य होईल, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.

एवढी इंजेक्शन्स मुदतबाह्य

- ससून रुग्णालय ......................... १०९१ (प्लेन ४८३ आणि लायफोसोमल ६०८)
- सांगली वैद्यकीय महाविद्यालय ... १७३० (प्लेन १३७० आणि लायफोसोमल ३६०)
- धुळे सर्वोचार रुग्णालय ................. ३० (प्लेन)
- सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई .......... १५ (प्लेन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SCROLL FOR NEXT