Muhammad Offensive statements Protest by Muslim community in Indapur nupur shrma naveen jindal pune  sakal
पुणे

मोहम्मद पैगंबर यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्य; इंदापूरात मुस्लिम समाजाकडून निषेध मोर्चा

शनिवार दि.११ जून रोजी इंदापूर बंद ची हाक

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी,असे प्रकार पुन्हा होवू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी या मागणीसाठी इंदापूरसकल मुस्लिम समाजाच्या वतीने दर्गा मस्जिद चौक ते इंदापूर प्रशासकीय भवन असा मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात शनिवार दि.११ जून रोजी इंदापूर बंद ची हाक देण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे,पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांना निवेदन देण्यात आले.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांनी बदनामीकारक व खोट्या आशयाचे विधान करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना भडकावून सामाजिक शांतता, सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन समाजात निष्कारण गैरसमज व तेढ निर्माण झाली असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. या मोर्चात मौलाना अब्दुल करीम मुशाहीदी, मौलाना समशुल हुडा, शकील सय्यद, गालिब बागवान, समद सय्यद, फिरोज पठाण,जावेद शिकलकार, मुशिरखान पठाण, इम्रान शेख, वासिम शेख, ऍड असिफ बागवान, नवाज बागवान, अजीज बागवान आदी मान्यवर सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT