Mukhyamantri Gram Sadak Yojana Khadakwasla-Kirkatwadi Shiv road work news pune  sakal
पुणे

अखेर खडकवासला-किरकटवाडी शिवरस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाला...

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी; सध्याच्या रस्त्यावरुन चालताना अधिकाऱ्यांचीही तारांबळ

निलेश बोरुडे

किरकटवाडी : वर्षानुवर्षे काम रखडलेल्या खडकवासला व किरकटवाडी या गावांच्या शिव रस्त्याच्या कामासाठी अखेर मुहूर्त ठरला असून येत्या 5 ऑगस्ट पूर्वी काम सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे शाखा अभियंता चेतन शिंदे यांनी दिली आहे. कामात येणाऱ्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली यावेळी अत्यंत खराब झालेल्या रस्त्यावरुन चालताना अधिकाऱ्यांची मात्र तारांबळ उडालेली दिसली.

खडकवासला गावच्या कोल्हेवाडी आणि किरकटवाडी गावच्या शिवनगर या भागासाठी शिव रस्ता हा एकमेव पर्याय आहे. सुमारे दहा ते पंधरा हजार लोकसंख्या या रस्त्यावर अवलंबून असून सध्या पावसामुळे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. डोंगरावरील माती मिश्रीत पाणी या रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांना पायी चालणे अवघड झाले आहे. जागोजागी खड्डे व गाळ असल्याने दुचाकी चालकांचे अपघात होत आहेत.

सदर रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे 87 लाख रुपये निधी मंजूर असून सुद्धा काही नागरिकांच्या विरोधामुळे काम रखडलेले आहे. स्थानिक नागरिक फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ॲप अशा समाज माध्यमांवरुन पदाधिकारी व प्रशासनाला धारेवर धरत आहेत.

आज मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली असून येत्या 5 ऑगस्ट पूर्वी काम सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी नागरिक सौरभ मते, सागर हगवणे, प्रताप निंबाळकर, प्रविण दसवडकर, गणेश लोहकरे आदी उपस्थित होते.

"नागरिकांच्या विरोधामुळे आत्तापर्यंत काम रखडले आहे. सध्या रस्त्याची स्थिती अत्यंत खराब असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मंजुरीनुसार आहे त्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण तातडीने करण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट पुर्वी काम सुरू होणार असून विरोध झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसे पत्र हवेली पोलीस ठाण्यात देण्यात येणार आहे."

- चेतन शिंदे,शाखा अभियंता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Robbery: पुण्यात अधिकारीच सुरक्षित नाहीत? मध्यरा‍त्री बंगल्यात घुसून विंग कमांडरच्या तोंडावर हात ठेवला अन् धक्कादायक दरोडा!

​PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? जाणून घ्या सर्वात महत्वाची अपडेट

Latest Marathi News Live Updates : सरकार मद्य विक्रीचे नवीन परवाने देणार, महाविकास आघाडी आक्रमक

loan waiver: कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क: राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, सरकारला दिलेल्या आश्‍वासनाचा पडला विसर

Pune Municipal Corporation: आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित; दुसऱ्या टप्प्यातील काम अद्याप शिल्लक

SCROLL FOR NEXT