Manjari Budruk River Bridge in under water sakal
पुणे

मांजरी बुद्रुक येथील मुळा- मुठा नदीवरील पूल पाण्याखाली

गेली तीन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार आणि खडकवासला धरणातून करण्यात आलेला विसर्ग यामुळे मुळा- मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

कृष्णकांत कोबल

गेली तीन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार आणि खडकवासला धरणातून करण्यात आलेला विसर्ग यामुळे मुळा- मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

मांजरी - गेली तीन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार आणि खडकवासला धरणातून करण्यात आलेला विसर्ग यामुळे मुळा- मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. येथील मांजरी-वाघोली रस्त्याला जोडणारा नदीवरील पूल या पाण्याखाली गेला असून त्यावरील वाहतूक जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे.

तीन दिवसांपासून मुळा-मुठा नदीत धरणातून पाणी सोडले जात आहे. हळू-हळू पाण्याची पातळी वाढत जाऊन अखेर आज सायंकाळी साडेचार वाजता येथील पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मांजरी बुद्रुक व मांजरी खुर्द या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.

दुपारनंतर पाणी वाढू लागले असतानाही प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. थेट पुलावरून पाणी वाहत असतानाही दोन्ही बाजूने प्रवासी धोकादायकपणे पूल ओलांडत होते. मांजरी खुर्द येथील कार्यकर्ते अशोक आव्हाळे प्रवाशांना सांगूनही ते ऐकत नसल्याने आव्हाळे यांनी शंभर क्रमांकावर संपर्क साधून धोक्याची सूचना दिली. त्यानंतर हडपसर व लोणीकंद पोलीसांनी येऊन पुलावरील वाहतूक बंद केली.

दरम्यान, याठिकाणी दोन्हीही बाजूने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी पूलावरील वाहतूक बंद करून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT