पुणे

मुळशीत तालुक्यात उद्या २६० बूथवर पोलिओ लस

CD

पिरंगुट, ता. २६ : मुळशी तालुक्यात रविवारी (ता. २८) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील ३४ हजार ६८७ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट असून, पालकांनी बालकांना बूथवर आणावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वामन गेंगजे यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे. तालुक्यात २६० बूथ उभारण्यात आले असून, ६२० कर्मचारी आणि ५१ पर्यवेक्षक या कामावर देखरेख ठेवणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये हे डोस उपलब्ध असतील.
दुर्गम भाग, वीटभट्ट्या आणि ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांवरील बालकांसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. आरोग्य, शिक्षण आणि महिला-बालकल्याण विभागाच्या समन्वयातून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे डॉ. गेंगजे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update: भारत हा महिलांच्या सन्मानाचा पुरस्कार करणारा देश आहे - कदम

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

SCROLL FOR NEXT