पुणे

प्रदेश संक्षिप्त

CD

मुंबई व परिसर

केटरिंग सेवांची
रेल्वेत तपासणी
मुंबई : ‘आयआरसीटीसी’च्या क्विक रिस्पॉन्स टीमने (क्यूआरटी) पश्चिम विभागातील विविध रेल्वेगाड्यांमध्ये अचानक तपासणी केली. या तपासणीत काही केटरिंग कर्मचाऱ्यांकडे निर्धारित गणवेश आणि वैध ओळखपत्र नसल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित सेवा प्रदात्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.


इमारतीला आग
मुंबई : कांदिवली पश्चिम परिसरात व्यावसायिक इमारतीला सोमवारी पहाटे भीषण आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील लॉजिंग हाऊसमध्ये अडकलेल्या ११ जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी जिन्याच्या साहाय्याने सुखरूप सुटका केली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
-----
बसची वाहनांना धडक
​मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील गोखले पूल सिग्नलवर सोमवारी ‘बेस्ट’च्या भाडेतत्त्वावरील बसचा साखळी अपघात घडला. बसचालकाने हँडब्रेक काढल्यानंतर अचानक बस पुढे सरकली. बसची चार ऑटोरिक्षा, एक मोटार आणि एका दुचाकीला जोराची धडक बसली. या अपघातात तीन नागरिक जखमी झाले आहेत.
---------
मराठवाडा

‘कृषी’चे जागावाटप जाहीर
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील कृषी शिक्षणाच्या नऊ व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर झाली. या फेरीत १८ हजार ९९३ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ८७१ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांत प्रवेशाची संधी मिळाली. यापैकी ३ हजार १४७ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले.
----

उत्तर महाराष्ट्र

प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या १३ विविध विद्याशाखांच्या १३२ वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे. पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि प्रमाणपत्र शिक्षणक्रमांचा यात समावेश आहे. इच्‍छुक विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्‍टपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येईल.
----------
भूकंपाचे पुन्हा धक्के
नाशिक : भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी जिल्हा पुन्हा एकदा हादरला. आदिवासीबहुल पेठ, सुरगाणा व दिंडोरी तालुक्यात सोमवारी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. यात कोणतीही हानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता अनुक्रमे २.५ व ३ रिश्टर स्केल होती.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT