Mumbai Trader Died in due to over consumption alcohol 
पुणे

मुंबईचा व्यापारी पुण्यात आला, रिक्षात बसला अन्.....

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नवी मुंबईहून पुण्यात आलेल्या व्यापाऱ्याला रिक्षातून कोरेगाव पार्क येथे नेले. तेथे रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी जबरदस्तीने मद्य पाजून त्यांच्याकडील चार लाखांची रोकड लंपास केली. मद्याचे अतिसेवन व थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकास अटक केली. 

मुलगाच ठरला आईसाठी वैरी; अखेर त्या माऊलीने संपविले...

राजेश लीलाधर म्हात्रे (वय 46, रा. बेलापूर, नवी मुंबई) असे व्यापाऱ्याचे नाव आहे. रिक्षाचालक शादाफ जहॉंगीर बांगी (वय 28) याला अटक झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद पत्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हात्रे हे 26 नोव्हेंबरला रात्री स्वारगेटला आले. एसटी स्थानकातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी रिक्षाचालक बांगी यास बुधवार पेठेत जायचे असल्याचे सांगितले. तेव्हा म्हात्रे यांच्या खिशामध्ये नोटांचे बंडल होते. तसेच, म्हात्रे यांनी मद्यपान केले होते. त्यामुळे बांगी याने त्यांना कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट परिसरातील स्मशानभूमीत नेले. तिथे दोन मित्रांना बोलाविले. त्यांनी म्हात्रे यांना जबरदस्तीने मद्य पाजले. नंतर खिशातील चार लाखांची रक्‍कम काढून घेतली व त्यांना तेथील झाडीमध्ये टाकून ते पळून गेले. दरम्यान, मद्याचे अतिसेवन व थंडीमुळे म्हात्रे यांचा मृत्यू झाला.
 

पुणे :..अन् रिक्षाचालकाने अनुभवले वर्दीतील 'देवदूत'

28 नोव्हेंबरला बर्निंग घाट परिसरामध्ये अज्ञात व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. बांगी याने म्हात्रे यांच्याकडील पैसे लुटल्याचे पोलिस तपासात उघड झाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Thane: भिवंडीच्या विकासाला नवी दिशा! घराणेशाहीला नकार; बदलाच्या राजकारणाला मतदारांची साथ, काँग्रेसचा शिलेदार उपमहापौरपदी विराजमान

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

SCROLL FOR NEXT