Municipal action on unauthorized constructions in Dhayari pune sakal
पुणे

धायरीमध्ये अनधिकृत बांधकांमावर पालिकेची कारवाई; काहींना मात्र अभय

कारवाईत दुजाभाव करण्यात येत असल्याचा नागरिकांचा आरोप..

विठ्ठल तांबे

धायरी : सिंहडगरस्ता परिसरातील धायरीतील रायकर मळा येथील सर्व्हे क्रमांक ७६ मधील अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या परिसरात प्रथमच जॉ कटरच्या साहाय्याने चार-पाच मजली इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या.यावेळी नागरिकांनी व संबंधीत  बांधकाम व्यावसायिकांनी तीव्र विरोध केला. परंतु या विरोधाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी न जुमानता ही कारवाई केली. ही कारवाई पुणे मनपा बांधकाम विभाग झोन क्र.२ पथकाने जॉ कटर मशीन, जेसीबी, बिगारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी व स्थानिक पोलीस अधिकारी यांचे सहकार्याने पार पाडली.

कारवाई दरम्यान चार बहुमजली इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. असे एकूण ५०००० चौ.फूट आरसीसी पक्के बांधकाम पाडण्यात आले. पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग झोन क्र.२ यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता राहुल साळुंके,यांच्या नियंत्रणाखाली उप अभियंता राहुल तिखे,इमारत निरीक्षक संदेश पाटील,कनिष्ठ अभियंता धनंजय खोले, निशिकांत छाफेकर, हेमंत कोळेकर, किरण अहिरराव इत्यादींच्या पथकाने ही कारवाई केली.

या वेळी एक जॉ कटर मशिन, एक जेसीबी व पंधरा कर्मचारी इत्यादींच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.यावेळी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. या वेळी सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे व वीस पोलीस कर्मचाऱ्यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या कारवाईनंतर मात्र, भागातील अन्य बांधकामांवर कारवाई कधी होणार? ठराविक अनधिकृत बांधकामांवरच कारवाई का? असे प्रश्न उपस्थित होत असून या कारवाईमुळे अवैध बांधकाम व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

" सदर कारवाई अनधिकृत बांधकामास सूचना पत्र नोटिसा देऊनही ही बांधकाम सुरू ठेवण्यात आल्याने करण्यात आली आहे. परिसरातील अन्य अनाधिकृत बांधकामांवरही टप्प्यांटप्यांने कारवाई करण्यात येणार आहे.नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा डीपी प्लॅन तयार करण्याचे काम सुरू आहे."

राहुल साळुंके, कार्येकरी अभियंता,बांधकाम विभाग,मनपा.

"आम्हाला नोटीस न देता सकाळी सकाळी कारवाई करण्यात आली असून ,ही कारवाई सूडबूद्धीने झाली आहे. परिसरात केवळ आम्हीच अनधिकृत बांधकाम केलेले नाही." सुभाष पवार- बांधकाम व्यावसायिक..

"ठराविक बांधकामांवर कारवाई न करता पालिका प्रशासनाने परिसरातील सर्वच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायला हवी. काही जागामाीलकांना निषाण्यावर ठेऊन पालिका प्रशासनाने काम करु नये."

संदीप पवार- बांधकाम व्यावसायिक..

धायरी परिसरातील रायकर मळा भागात मागील पाच वर्षात अनेक वेळा हजारो अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या परंतु कारवाया मात्र बोटावर मोजण्या इतक्याच झाल्या आहेत. अनेक ठिकाणी तर कारवाई करण्याची नोटीस बजावली जाते व नंतर बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तडजोडीसाठी बोलावले जाते.जर लाखों रूपयांची तडजोड झालीच तर इमारत पडणे थांबते. तडजोड झालीच नाही तर काही दिवसांनी त्या इमारतीवर कारवाई केली जाते अशी चर्चा धायरी परिसरातील नागरिक करत आहेत.अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. अनेक वेळा बांधकाम व्यावसायिकांना नोटीस देऊन देखील कारवाई होत नाही मात्र आक्षेप घेतला तर स्लॅबला ब्रेकर च्या साह्याने छिद्रे पडून कारवाई झाली असे दाखवले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT