pune municipal commissioner rajendra bhosale sakal
पुणे

Pune News : नाले सफाई १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश

पावसाळ्याच्या पूर्वी शहरातील नाले सफाई करण्यासाठी कामे सुरु झाली असून, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आज (ता. २३) आंबिल ओढा, नागझरी नाला, माणिक नाल्याची पाहणी केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पावसाळ्याच्या पूर्वी शहरातील नाले सफाई करण्यासाठी कामे सुरु झाली असून, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आज (ता. २३) आंबिल ओढा, नागझरी नाला, माणिक नाल्याची पाहणी केली. वस्तीमध्ये पाणी घुसणाऱ्या धोकादायक ठिकाणांवरील कामे १५ मे पूर्ण करावीत असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पुणे महापालिकेने यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाले सफाई आणि पावसाळी गटारांच्या सफाईची निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करून कामाला सुरूवात केली आहे. यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयासाठी प्रत्येकी नाले सफाई आणि पावसाळी गटारांची स्वच्छता यासाठी स्वतंत्र निविदा काढली आहे.

गेल्या काही वर्षात नाले सफाईची कामे उशिरा सुरु केल्याने जून महिना उजाडला तरीही कामे सुरुच असतात. उशीर झाल्यानंतर कामे लवकर पूर्ण करण्यासाठी गाळ न काढता वरवरचे गवत, कचरा काढून नाले सफाई झाल्याचे दाखविण्याचा प्रशासनाचा व ठेकेदाराचा खटाटोप सुरु असतो.

आज आयुक्त भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, मलःनिसारण विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष तांदळे, दिनकर गोजारे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी सकाळी नाले सफाईची कामे पाहण्यास सुरुवात केली. वैकुंठ स्मशानभूमी, दांडेकर पूल, शिवदर्शन, आरणेश्‍वर, के.के. मार्केट, कात्रज गाव, कात्रज तलाव येथे पाहणी केली. त्याच प्रमाणे नागझरी व माणिक नाल्याच्या परिसरात पाहणी केली. सायंकाळ पर्यंत आयुक्तांचा हा दौरा सुरु होता.

पाणी प्रश्‍नाकडे दिले लक्ष

मांगडेवाडी, भिलारेवाडी, येवलेवाडी या भागात पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. या दौऱ्यात आयुक्तांनी या प्रश्‍नाकडे लक्ष दिले. मांगडेवाडी येथील विहिरीतील गाळ काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच कात्रज तलावातील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे तेथेही स्वच्छता करण्यास सांगितले आहे. कात्रज तलावात सांडपाणी येत असल्याने परिसरातील सोसायट्यांना डासांचा व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे, त्याबाबत नागरिकांनी तक्रार केल्याने हा तळ्यात येणारे घाण पाणी रोखावे असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

४५ टक्के काम पूर्ण

१५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत नाले सफाईचे काम सुरु आहे. आत्तापर्यंत सरासरी ४५ ते ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर कलव्हर्ट व इतर अवघड ठिकाणची सफाई ७० टक्के झाली आहे. १५ मे पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

‘आंबिल ओढा, नागझरी नाला, माणिक नाल्यांच्या परिसरात फिरून नाले सफाईचा आढावा घेतला आहे. महत्त्वाच्या ठिकाणचे काम १५ मे पर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे. नाले सफाईचे काम व्यवस्थित झाले असून, मी त्याबाबत समाधानी आहे.’

- राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT