E-Learning-School
E-Learning-School 
पुणे

महापालिकेच्या ‘ई-लर्निंग’ शाळा कागदावर

दिलीप कुऱ्हाडे

येरवडा - वस्त्यांमधील मुला-मुलींना ई-लर्निंगच्या माध्यमातून सहज व आनंददायी शिक्षण देता यावे, हा उद्देश महापालिकेचा आहे. मात्र या शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ नावालाच असल्याचे दिसते. भिंतींवर बसविण्यात आलेले एलईडी स्क्रीन कधी संवाद साधतील, याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे.

महापालिकेने शहरात पाच ई-लर्निंग स्कूल सुरू केल्या आहेत. तर तब्बल शंभर ई-लर्निंग स्कूल सुरू करण्याच्या प्रस्ताव आहे. सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मात्र येरवड्यातील क्रांतिवीर लहुजी वस्ताद शाळा, हडपसर, औंध व पर्वती दर्शन येथील ई-लर्निंग शाळा केवळ कागदावरच आहेत. यातील लहुजी वस्ताद शाळेला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. येथील शाळेच्या भौतिक सोई-सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिल्यास या शाळेला ई-लर्निंग शाळा का म्हणावे, असा प्रश्‍न पडतो.

विमानतळ रस्त्यावर तब्बल बारा कोटी रुपये खर्च करून लहुजी वस्ताद ई-लर्निंग शाळेची इमारत बांधली आहे. शाळेत नर्सरी ते सातवीपर्यंतचे वर्ग असून, पटसंख्या नऊशे आहे. शाळेत २६ वर्ग आहेत. यापैकी वीस वर्गात एलईडी स्क्रीन बसविण्यात आले आहेत. मात्र वर्गासाठी आवश्‍यक सॉफ्टवेअर बसविण्यात आले नाही. त्यामुळे नियमित, कंत्राटी व खासगी संस्थेचे शिक्षक आपल्या क्षमतेप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवितात.

‘सकाळ‘च्या प्रतिनिधीने चौथीच्या वर्गाला भेट दिली असता, तेथे एक कंत्राटी शिक्षक विद्यार्थ्यांना फळ्यावर काही इंग्रजी वाक्‍य लिहून देत होते. पाच वाक्‍यांच्या ओळींमध्ये चार चुका होत्या. या वेळी मुख्याध्यापिका सोफिया गायकवाड व पर्यवेक्षिका गुजर यांनी शिक्षकाची चूक दाखविली. मात्र घाईत लिहिल्यामुळे चूक झाल्याची सारवासारव संबंधित शिक्षकाने केली.

विद्यार्थ्यांचे प्रयोग यू-ट्यूबवर
लहुजी वस्ताद ई-लर्निंग शाळेत टीच फॉर इंडिया संस्थेचे शिक्षक विद्यार्थ्यांना वस्तुमान, गुरुत्वाकर्षण, ऊर्जा, शक्ती आदींचे प्रयोग करून दाखवत होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या मदतीने केलेले हे सर्व प्रयोग शिक्षकांनी मोबाईलवर चित्रीकरण करून ‘यू- ट्यूब‘वर अपलोड केले आहेत.

लहुजी वस्ताद शाळेला पुरेसे शिक्षक दिले आहेत. शिक्षकांचे प्रशिक्षण होणे अपेक्षित आहे. इतर सोई-सुविधांबाबत महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे.
- सुभाष सातव, सहायक शिक्षण अधिकारी, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT