Municipal employees accidently broke MSEDCL cable drainage repair work Power outage in Kirkatwadi pune  sakal
पुणे

चेंबर दुरुस्तीसाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी तोडली महावितरणची केबल

दुपारी तीन वाजल्यापासून किरकटवाडीचा वीजपुरवठा खंडित;महावितरण कर्मचाऱ्यांकडून भर पावसात दुरुस्तीचे काम सुरू

निलेश बोरुडे

किरकटवाडी : किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावरील करंजावणे वस्तीजवळ चेंबर दुरुस्तीसाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांकडून किरकटवाडी गावाला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वीजवाहक केबलला धक्का लागल्याने दुपारी तीन वाजल्यापासून संपूर्ण किरकटवाडी गावचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांकडून भर पावसात सदर ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असून वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी पहाटे तीन ते चार वाजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

किरकटवाडी गावठाणातील करंजावणे वस्तीजवळ मुख्य रस्त्यावर असलेल्या चेंबरचे झाकण मागील दोन महिन्यांत चार वेळा फुटले. यावेळी सदर ठिकाणी चांगली दुरुस्ती करण्यात येईल असे पालिकेच्या पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता रमेश पाटोळे यांनी सांगितले होते.त्यानुसार पालिकेचे कर्मचारी चेंबरच्या कडेचा कॉंक्रिट रस्त्याचा भाग तोडत होते. त्याचवेळी केबलला धक्का लागल्याने मोठा आवाज झाला व संपूर्ण गावचा वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेत चेंबर दुरुस्तीसाठी आलेला एक कर्मचारी थोडक्यात बचावला आहे.

याबाबत माहिती मिळताच महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कल्याण गिरी व सहाय्यक अभियंता सचिन आंबवले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी केबल दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. कॉंक्रिट रस्ता तोडून केबल बाहेर काढण्यास व त्यानंतर दुरुस्तीसाठी वेळ लागणार असल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी पहाटेचे तीन ते चार वाजतील अशी शक्यता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT