Teacher 
पुणे

शिक्षकांची नेमणूक आता अकरा महिन्यांसाठी

सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पुरेशा सुविधा देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता प्रशासनाने पाऊल उचलण्यास सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्यात हंगामी शिक्षकांची सहा महिन्यांऐवजी अकरा महिन्यांसाठी नेमणूक केली जाणार असून, या बाबतची प्राथमिक कार्यवाही पूर्ण झाली आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल. त्यामुळे सर्व शाळांमध्ये पूर्ण वेळ शिक्षक उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.  

आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महापालिकेने २००३ पासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षात ६० शाळांमध्ये १९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याकरिता महापालिकेने आतापर्यंत केवळ तीनशे शिक्षकांची कायमस्वरूपी तत्त्वावर नेमणूक केली आहे. तर सहा महिन्यांच्या मुदतीनुसार दोनशे शिक्षकांच्या नेमणुकीचा आदेश देण्यात आला. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक अपेक्षित असताना ६१ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच, हंगामी शिक्षकांच्या नेमणुका सहा महिन्यांनंतर रद्द होतात. त्यामुळे निम्म्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये एवढ्या शिक्षकांची कमतरता असते. 
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

या पार्श्‍वभूमीवर या पुढील काळात सर्व शिक्षकांच्या नेमणुकीचा अकरा महिन्यांचा करार करण्यात येणार आहे. त्याआधी राज्य सरकारकडे शिक्षण विभागाचा आकृतिबंध पाठविला आहे. तो महिनाभरात मंजूर होण्याची शक्‍यता आहे.

सहा महिन्यांच्या नेमणुकांमुळे काही अडचणी येतात. त्यामुळे आता नेमणुकीचा करार वाढविण्याचा प्रस्ताव आहे. या बाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
- शिवाजी दौंडकर, प्रमुख, शिक्षण विभाग, महापालिका 

शिक्षण विभागाचा आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर शिक्षक उपलब्ध होणार आहेत. तरीही हंगामी शिक्षकांना अकरा महिन्यांसाठी घेण्यात येईल. त्याकरिता राज्य सरकारशी चर्चा करण्यात येत आहे.
- श्रीनाथ भिमाले, सभागृहनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात ऐकावे ते नवलच! दिवाळीनिमित्त फायटर कोंबड्यांची पैशांवर झुंज; सहा आरोपींना अटक, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

CM Devendra Fadnavis: वंचितांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राज्यात २५ लाख दीदींना लखपती केले

Pune Weather Update : पहाटे गारवा, दिवसा 'ऑक्टोबर हिट'चा चटका, बदलत्या वातावरणामुळे पुणेकर हैराण; पुढील दोन दिवस कसे असेल हवामान?

Balasaheb Thorat: शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा: बाळासाहेब थोरात; अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान

सलमानच्या गाजलेल्या तेरे नामचा सिक्वेल येणार ? निर्माते म्हणाले..

SCROLL FOR NEXT