Pune Municipal Sakal
पुणे

महापालिकेतील निविदेसाठी वरिष्ठ अधिकारी मैदानात उतरले

सांडपाणी वाहिन्या स्वच्छ करण्यासाठी चार जेंटिंग विथ रिसायकल मशिन ३२ कोटी रुपये खर्च करून पुढील सात वर्षांसाठी भाडेकराराने घ्याव्यात, यासाठी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी मैदानात उतरले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सांडपाणी वाहिन्या (Drainage Waterline) स्वच्छ करण्यासाठी चार जेंटिंग विथ रिसायकल मशिन ३२ कोटी रुपये खर्च (Expenditure) करून पुढील सात वर्षांसाठी भाडेकराराने (Rent Agreement) घ्याव्यात, यासाठी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी (Senior Officer) मैदानात उतरले आहेत. मर्जीतील ठेकेदारालाच हे काम मिळावे, यासाठी निविदेत त्यानुसार अटी-शर्ती (Terms and Condition) टाकण्यात आल्या आहेत. दरम्यान, या अटी-शर्तींवर काही कंपन्यांनी आक्षेप घेतला आहे. प्रशासन मात्र ठाम राहिल्याने यातून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Municipal Tendor Senior Officer Contractor)

पुणे महापालिकेच्या हद्दीतील ड्रेनेज लाइनची साफसफाई १२ के. एल. क्षमतेच्या ४ हायकपॅसिटी सक्शन पंप जेंटिंग विथ रिसायकल यंत्राच्या साहाय्याने पुढील सात वर्षे भाडेकराराने घेण्यासाठी महापालिकेकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. सुमारे ३२ कोटी रुपयांचे हे काम आहे. या यंत्राच्या साहाय्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा ड्रेनेज लाइनमध्ये टाकण्यात येणार आहे. प्रथमच अशा प्रकारे पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या हेतूने ही निविदा काढण्यात आली आहे. मर्जीतील ठेकेदारालाच हे काम कसे मिळेल, यासाठीच्या अटी-शर्ती तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर काही कंपन्यांनी आक्षेप नोंदविला आहे. मात्र प्रशासन सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे.

वादाला फुटणार तोंड

मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या सेवेतील दोन अतिवरिष्ठ अधिकारी यासाठी दबाव आणत आहेत. याबाबत अधिकृतरीत्या प्रशासनातील कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही. त्यामुळे या निविदा प्रक्रियेवरून नवा वाद उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

PM मोदींचा VIDEO अन् नड्डांची भेट, वांगचुक यांचं उपोषण मागे; पण CJPचे आंदोलन सुरूच, प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम

आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २ लाख! पंढरपूर तालुक्यातील ‘या’ ७ शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कर्जमुक्तीचे सातबारा, पंढरपूर बाजार समितीत कृषी महोत्सव

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

SCROLL FOR NEXT