Murder accused jailed within 24 hours sakal
पुणे

Pune : खुनाच्या गुन्हयातील आरोपी २४ तासांच्या आत जेरबंद

सिंहगड रोड पोलीस स्टेशनची कामगिरी

विठ्ठल तांबे

सिंहगड रोड पोलीस स्टेशनची कामगिरी

धायरी : गारवा हॉटेलचे मॅनेजर  भरत भगवान कदम यांचा खून प्रकरणात तीन जणांसह अल्पवयीन मुलावर कारवाई करण्यात आली. आरोपी २४ तासांच्या आत जेरबंद करण्यात सिंहगड रोड पोलिसांना यश आले. एकाच महिलेवर असलेल्या प्रेमसंबधांवरुन हा खून करण्यात आला.

भरत भगवान कदम (वय २४ वर्षे, व्यवसाय चालक, फ्लॅट नं ४०५. धायरेश्वर प्राईड बिल्डींग, राममंदिरसमोर, मतेनगर, धायरी) मोपेड गाडीवरुन घरी जात असताना अचानकपणे मागून आलेल्या चार ते पाच अनोळखी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. धायरेश्वर मंदिर ते पारी कंपनी चौककडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेस, ३१ तारखेच्या रात्री बारा ते साडेबारा दरम्यान ही घटना झाली. ठिकठिकाणी ४८ वेळा धारदार कोयत्याने वार करून कदम यांना अत्यंत निर्दयीपणे ठार करण्यात आले.

१) अनिकेत अरुण मोरे (वय २५ वर्षे रा. सध्या फ्लॅट नं. २३ मुक्ताई व्हीला बेनकरवस्ती धायरी मूळ  गाव निगडी

२) धीरज शिवाजी सोनवणे (वय १९ वर्षे रा. पंडीत दीनदयाळ शाळा, गणेशनगर तळमजला भारतकुंज अपार्टमेंट कोथरूड

३) सनी उर्फ योगेश हिरामण पवळे (वय १९ वर्षे रा. वसंत नगर येराईरोड, खडकेश्वर मित्रमंडळ चौक, शंकर मंदिराशेजारी कोथरूड) एक विधीसंघर्षित मुलगा अशी आरोपींची ओळख आहे.

तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की अनिकेत मोरे व त्याच्या इतर साथीदार यांनी हल्ला ह केलेला आरोपी  धायरेश्वर मंदिराचे पाठीमागील बाजुस बसले आहेत.पोलीस निरीक्षक व जयंत राजुरकर (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन निकम व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी हालचाली सुरु केल्या. धारेश्वर मंदिराच्या मागे चार जण बसलेले असल्याचे दिसल्याने त्यांना काही कळायच्या आत ताब्यात घेतले. त्यांना त्याचे नाव पत्ते विचारता त्यांनी माहिती सांगितली.

भरत कदम व आरोपी अनिकेत मोरे  एकमेकांच्या ओळखीचे असुन त्यांच्यामध्ये सुमारे चार ते पाच महिन्यापूर्वी एकाच महिलेवर असलेल्या प्रेमसंबधांवरुन भांडणे झाली होती. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी मोरे याने त्याचा मावस भाऊ  धीरज सोनवणे व त्याचे मित्र यांच्या करवी मयताचा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली.

दाखल गुन्हयाचे घटनास्थळ हे मुख्य रोडपासून आतमध्ये निर्मनुष्य आहे. त्या ठिकाणी कोणतेही सी.सी.टि.व्ही फुटेज मिळून आले नाही. सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावर जाणारे येणारे रोडवरील सर्व सी. सी.टि.व्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेष्णाची पडताळणी केली. सर्व बाजुने आरोपींचा शोध घेतला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव  करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, हपोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक  ,अप्पर पोलीस आयुक्त ( पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेंद्र डहाळे, उप-आयुक्त परिमंडळ ३ पोर्णिमा गायकवाड तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर,

सहाय्यक पोलीस निरीक्षक,सचिन निकम, दीपक कादाबाने, आबा उत्तेकर तसेच सुनिल चिखले, (सहा. पोलीस फौजदार)  संजय शिंदे (हवालदार) पोलीस अंमलदार अमित बोडरे, अमेय रसाळ, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, अविनाश कोडे, अमोल पाटील, स्वप्नील मगर, विकास पांडुळे, विकास बांदल, सागर शेडगे केतन लोखंडे, गणेश झगडे, गौतम किरतकुडवे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT