murder
murder Sakal
पुणे

दारु पिल्यानंतर झालेल्या वादातून चाकूने गळा कापून खून

सकाळ वृत्तसेवा

दारु पिल्यानंतर झालेल्या वादतून दोघांनी एकाचा चाकूने गळा कापून खून केला.

पुणे - दारु पिल्यानंतर झालेल्या वादतून दोघांनी एकाचा चाकूने गळा कापून खून केला. ही घटना घटना सोमवारी मध्यरात्री जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारती समोरिल सार्वजनिक स्वच्छागृहासमोरील पदपथावर घडली.

संजय असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रभातकुमार कमलाकर म्हस्के (वय 36, रा. सोलापूर), निलेश बाळासाहेब भोसले (वय 25, रा. वेल्हे, शिवापूर) या दोघांना अटक केली आहे.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय, निलेश व प्रभातकुमार हे तिघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तिघे मिळेल ती कामे करून फुटपाथवर राहतात. सोमवारी प्रभातकुमार याला केटरींगच्या कामाचे 1600 रुपये मिळाले होते. तिघांनी एकत्र येऊन रात्री दहा वाजता मद्यप्राशन केले.

संजय याने पुन्हा दारु पाजण्याचा आग्रह केल्यामुळे परत मद्यप्राशन केले. त्यानंतर तिघे रेल्वेस्थानकाकडे निघाले होते. संजय याने प्रभातकुमार याच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र पैसे संपल्यामुळे त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेेळी त्यांच्यात वाद झाले. त्यातून दोघांनी संजय याच्या गळा आंबा कापण्याच्या छोट्या चाकूने कापला. खून केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. खून झालेला व्यक्ती अज्ञात होता.

पोलिसांसमोर मृत व्यक्तीची ओळख पटविण्याबरोबरच आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान होते. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, मृत व्यक्ती व दोघे आरोपी एकत्र जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक संदीप जोरे, कर्मचारी सुशिल लोणकर, संतोष काळे, निलेश साबळे, हेमंत पेरणे यांच्या पथकाने दोघांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी चाकूने गळा कापून खून केल्याची माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT