Murder esakal
पुणे

Daund Crime: दौंड हादरलं! तृतीयपंथीयाची राहत्या घरात गळा चिरून निघृण हत्या

सकाळ वृत्तसेवा

वरवंड - वरवंड (ता. दौंड) येथे दोन दिवसांपूर्वी एका तृतीयपंथीयाचा राहत्या घरात गळा चिरून निघृणपणे खून झाल्याची घटना गुरुवारी (ता. ८) सकाळी उघडकीस आली. मात्र, यवत पोलिसांनी काही वेळातच तपासाची चक्रे फिरून संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सचिन ऊर्फ सोनूदीदी दिनेश जाधव (वय ४०, मूळ, रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर, सध्या रा. वरवंड), असे खून झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत ऊर्फ चंदर शिवाजी जाधव (वय ३०, रा. वरवंड) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. ६ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या आसपास ही घटना घडली.

याबाबत खोली मालक बापू खोमणे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी माहिती दिली की, फिर्यादी बापू खोमणे यांच्या एका खोलीत तृतीयपंथी राहत होता. गुरुवारी सकाळी काही जणांना खोलीतून दुर्गंधी आल्याने संशय आला.

याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार घटनेची माहिती मिळतात यवत पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, परीविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी रेखा वाणी, संजय नागरगोजे, विजय कोल्हे आदी घटनास्थळी धाव घेतली.

दोन दिवसांपूर्वी हा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. यवत पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यामध्ये आरोपीवर संशय बळावला गेल्याने हवालदार संभाजी कदम, गुरू गायकवाड अक्षय यादव, नीलेश कदम आदींच्या पथकाने अवघ्या काही वेळातच आरोपीला अटक केली. खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT