murder case has finally reveled wife killed husband with help of child
murder case has finally reveled wife killed husband with help of child sakal
पुणे

आत्महत्येचा बनाव करुन खुन करण्याच्या प्रकरणाचा अखेर उलगडा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कात्रज येथे आत्महत्येचा बनाव करुन खुन करण्याच्या प्रकरणाचा भारती विद्यापीठ पोलिसांनी उलगडा केला. पती सातत्याने चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत असल्यामुळे पत्नीनेच अल्पवयीन मुलाच्या मदतीने पतीचा खुन केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. दरम्यान, पोलिसांनी पत्नीला अटक केली, तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यास बालसुधारगृहात पाठविले.

शालन जाधव (वय 37) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रकाश किसन जाधव (वय 42, रा. कात्रज) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजता प्रकाश जाधव यांचा गळफास लावलेला मृतदेह एका खांबाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात जाधव यांचा गळा दाबून तसेच डोक्‍यावर मारहाणकरुन खून केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध घेण्यात येत होता. त्यावेळी घटनेच्या दिवशी जाधव यांच्या घरी भांडणे झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी जाधव यांची पत्नी शालन जाधव हिच्याकडे चौकशी केली.

त्यावेळी तिने आपल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने हा खुन केल्याची कबुली दिली. पती सतत चारित्र्यावर संशय घेऊन शालिनी जाधव हिला मारहाण करीत होता. त्यामुळे घटनेच्या रात्रीही जाधवने तिला मारहाण केली होती. त्यामुळे त्यांच्या अल्पवयीन मुलाने जाधव यांचा गळा दाबून भिंतीवर ढकलून दिले होते. या घटनेत ते बेशुद्ध होऊन त्यांचा मृत्यु झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर हि घटना लपविण्यासाठी त्यांनी जाधव यांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचे पोलिसांना सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव, पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलिस कर्मचारी गणेश भोसले, रविंद्र चिप्पा, सोमनाथ सुतार, सचिन पवार हर्षल शिंदे, संतोष खताळ, गणेश शेंडे, विक्रम सावंत, आकाश भासगे, अभिजित जाधव,राहुूल शेंडगे, रविंद्र भोरडे, गणेश सुतार, तुळशीराम टेंभुर्णे यांच्या पथकाने केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT