राहुल नलावडे
राहुल नलावडे  
पुणे

कोयत्याने हल्ला करून तरुणाचा खून

सकाळवृत्तसेवा

खडकवासला - पूर्वीच्या भांडणावरून सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास डोणजे येथे राहुल अनंता नलावडे (वय २६, रा. डोणजे) याच्यावर तीन तरुणांनी कोयत्याने हल्ला करून त्याचा खून केला. हवेली पोलिस त्या तिघांचा शोध घेत आहेत. 

याप्रकरणी पोलिसांनी संदेश कोंडेकर (वय १९), निखील ऊर्फ हनमा चव्हाण व एका अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली. राहुल आणि संदेश हे दोघे डोणजे चौकातील एकाच इमारतीत राहत होते. सोमवारी रात्री मित्राच्या वाढदिवसासाठी राहुल दुसऱ्या मित्रासमवेत घरातून बाहेर पडला. पानशेत रस्त्यावरून वाढदिवसासाठी चालत जात असताना या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या वेळी अंधारात दुचाकीवरून तिघे जण आले. त्यातील संदेशने कोयत्याने वार केले. यात राहुल जखमी झाला.

त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री पोलिस अधीक्षक सुहास गरूड यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे.   

राहुल हा मूळचा वेल्हे तालुक्‍यातील निगडे गावचा आहे; परंतु वडिलांचे निधन झाल्याने डोणजे या मामाच्या गावात तो आई, पत्नी आणि लहान मुलासमवेत राहत होता, तर संदेश मुळचा हवेली तालुक्‍यातील कल्याण गावचा रहिवाशी आहे. ते दोघे डोणजे चौकातील एकाच इमारतीत राहत असल्याने एकमेकाला ओळखत होते. राहुलने २६ डिसेंबर रोजी एका लग्नात आणि त्या अगोदर एक महिना किरकोळ कारणावरून संदेशला मारहाण केली होती. यामुळे राहुल याच्याबद्दल संदेशच्या डोक्‍यात राग होता. शवविच्छेदन केल्यानंतर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी, राहुलचे नातेवाईक व डोणजे ग्रामस्थांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT