Pune Crime esakal
पुणे

उधारीचे 20 हजार मागितले म्हणून कुऱ्हाडीनं 14 वार करून तरुणाला संपवलं

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे.

पुण्यात गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक प्रकरण समोर आलंय. उधारीचे पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीनं डोक्‍यावर वार करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी इथं घडलीय.

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून युवराज बाबुराव जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे. तर, गणेश सुरेश खरात याला अटक करण्यात आलीय. गणेश हा सराईत गुन्हेगार असल्याचं कळतंय.

युवराजचे वडील बाबुराव जाधव यांची दुधाची डेअरी (Milk Dairy) आहे. त्यांचा मुलगा त्यांना व्यवसायात मदत करत होता. गणेशनं युवराजकडून 20 हजार रुपये हात उसणे घेतले होते. दरम्यान, युवराज हा गणेशकडं सातत्यानं दिलेलं पैसे मागत होता. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेश हा युवराजच्या घराबाहेर आला आणि युवराजनं पुन्हा एकदा गणेशकडं पैशासाठी तगादा लावला. याचा राग आल्यानं गणेशनं जवळील कुऱ्हाडीनं युवराजच्या डोक्‍यावर सपासप वार केले आणि त्याचा खून केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT