पुणे

वाई:-खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.

CD

खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप

वाई, ता. १ : बहिणीसोबत प्रेम असल्याच्या संशयावरून युवकाचा खून करून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अभेपुरी (ता. वाई) येथील एकास वाईचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी जन्मठेप आणि २६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रूपेश ऊर्फ पप्पू शिवाजी चव्हाण (रा. अभेपुरी, ता. वाई) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, रूपेश चव्हाण यास त्याच्या बहिणीचे अरुण नामदेव मोहिते याच्यासोबत प्रेमसंबंध असावेत, असा संशय होता. त्याचा राग मनात धरून त्याने अरुण मोहिते याच्या डोक्यात वार खून केला व त्याचे प्रेत अंगावरील कपड्यासह कॅनॉलचे वाहते पाण्यात फेकून दिले. याबाबत अक्षय मोहिते याने वाई पोलिसात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक बबन येडगे यांनी करून सदर आरोपीवर न्यायालयात दोषारोप पत्र पाठविले होते. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहरे  यांच्या न्यायालयात  झाली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ए. आर. कुलकर्णी यांनी काम पाहिले. या खटल्यात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षीवरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तिवाद व न्यायालयासमोर आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीशांनी रूपेश चव्हाण याला दोषी ठरवत जन्मठेप व २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली, तसेच दंड रकमेतील २५ हजार रुपये  मयताच्या आईस देण्याचा निकाल दिला. या खटल्यात पोलिस अधीक्षक सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बबन येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस हवालदार कदम यांनी कामकाज पाहिले. याकामी पोलिस प्रॉसिक्युशन स्कॉडचे सहाय्यक फौजदार श्री. डेरे, श्री. पांब्रे, श्री. काळे, कॉन्स्टेबल श्री. कुंभार, श्री. कदम, श्री. नाळे, श्री. सकपाळ यांनी मदत केली.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Education Director Killed : पलूस हादरलं! शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; मुलाने पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात वडिलांचा मृतदेह पाहिला अन्...

ही मालिका मिळूदे म्हणून बोलले आणि... गुढी पाडव्याला गावाला जाणार आहे विजय बाबर; अभिनेत्रींनी सांगितले खास प्लॅन

Jaykumar Gore: कायदा-नियम बदलू, पण मराठा समाजाचे प्रश्न सोडवू: पालकमंत्री जयकुमार गोरे; मला बाहेरचा म्हणू शकत नाही, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT