Laxman-Divekar
Laxman-Divekar 
पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर दौंडमध्ये प्राणघातक हल्ला

सकाळवृत्तसेवा

वरवंड - कडेठाण (ता. दौंड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग दिवेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सोमवारी (ता. २९) रात्री साडेनऊ वाजता गावात यात्रा उत्सवानिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. 

याबाबत जखमी लक्ष्मण दिवेकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार यवत पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राहुल यादव यांनी माहिती दिली की, याप्रकरणी दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी दिवेकर, ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सतीश कोऱ्हाळे यांच्यासह सहा जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी दिवेकर, हनुमंत दिवेकर, सतीश कोऱ्हाळे, ज्ञानदेव कोऱ्हाळे, शहाजी दिवेकर, सागर (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) इतर पाच जण (सर्व रा. कडेठाण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कडेठाण गावचा यात्रा उत्सवाचा कार्यक्रम होता. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सोमवारी (ता. २९) यात्रेचा दुसरा दिवस होता. रात्री नऊ वाजता नागरिकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तमाशा सुरू होऊन काही वेळ गेल्यानंतर लक्ष्मण दिवेकर यांच्यावर आरोपींनी अचानक हल्ला चढविला. या वेळी आरोपी सागर याने सत्तूरने फिर्यादी दिवेकर यांच्यावर वार करण्यास सुरवात केली. या वेळी शिवाजी दिवेकर यांनी लक्ष्मण दिवेकर यांना धरून ठेवले, तसेच इतर आरोपींनी शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, लक्ष्मण दिवेकर यांच्या पोटाच्या बाजूला, हातावर, डोक्‍यावर वार करण्यात आले आहेत. गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी तत्परता दाखवून त्यांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. 

गावात तणावाचे वातावरण
या घटनेबाबत माहिती मिळताच यवत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत गावात तणावाचे वातावरण होते. दवाखान्याभोवती मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावातील काही दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दिवसभर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश मोरे, पोलिस निरीक्षक सूरज बंडगर आदी पोलिस अधिकाऱ्यांनी गावात भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT