पुणे

नागणसूर येथील गुलाब फुलशेतीने शोधला उत्पन्नाचा नवा मार्ग ; विविध सहा प्रकारच्या गुलाबाच्या फुलांस चांगली मागणी

CD

JEU26B07833, JEU26B07834, JEU26B07835

नागणसूरमध्ये गुलाब शेतीचा सुगंधी प्रयोग यशस्वी
दररोज ७०–८० किलो उत्पादन; पारंपरिक शेतीला फाटा देत फूलशेतीतून साधली प्रगती

राजशेखर चौधरी ः सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. २४ : नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील प्रचंडेप्पा नीलप्पा प्रचंडे यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत दोन एकरांवर गुलाब शेती फुलवून शाश्वत उत्पन्नाचे साधन उभे केले आहे. मेहनत, नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास यांच्या जोरावर त्यांनी वेगळी वाट निवडून ती यशस्वी करून दाखवली आहे. ‘सांबा’, काटेरी, डबल कलर, पांढरा अशा विविध प्रकारांसह एकूण सहा रंगांचे गुलाबाचे दररोज ८० किलोपर्यंत उत्पादन घेतले जात आहे.

प्रचंडेप्पा यांनी अभियंता असलेले त्यांचे बंधू गुरप्पा यांच्या सहकार्याने दोन एकरांवर गुलाब लागवड केली आहे. ‘सहा रंगांचे गुलाब त्यांनी सहा महिन्यांपूर्वी लागवडीत आणले. सुरुवातीला दररोज पाच किलो उत्पादन मिळत होते; मात्र योग्य मशागत, नियोजनबद्ध खत व औषध फवारणी आणि पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन यामुळे आज उत्पादन दररोज ८० किलोपर्यंत पोचले आहे.
गुलाबाला हंगामानुसार प्रतिकिलो ४० ते १२० रुपये दर मिळत आहे. भावात चढ-उतार असला तरी खर्चाच्या तुलनेत चांगले उत्पन्न हाती येत असल्याचे ते सांगतात. सध्या सोलापूर, अक्कलकोट आणि हैदराबाद या बाजारपेठांमध्ये ते फुलांची विक्री करीत आहेत.
या गुलाब बागेचे आयुष्य सुमारे सहा वर्षांचे असून हंगामात मागणी वाढल्याने अधिक चांगला दर मिळतो. लाल, पांढरा, नारिंगीसह विविध रंगांच्या फुलांनी बाग खुलून गेली आहे. उसासारख्या पिकाला १४–१५ महिने वेळ द्यावा लागतो आणि खर्चही मोठा असतो. वेळेवर पैसे हाती येत नसल्याने प्रचंडेप्पा यांनी पर्यायी शेतीचा मार्ग स्वीकारला आणि सातत्यपूर्ण उत्पन्नाचा स्रोत उभा केला.

कोट
- शेतीमध्ये सततच्या उत्पनासाठी गुलाब शेतीची निवड केली. योग्य मशागत, देखभाल यांनी ती यशस्वी झाली आहे. तरुण शेतकरी बांधवांनी बाजाराचा कल ओळखून वेगवेगळे प्रयोग करावेत. गुलाब फूल शेतीत सुद्धा चांगली उत्पन्नाची संधी आहे.
- प्रचंडेप्पा निलप्पा प्रचंडे, शेतकरी, नागणसूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT