पुणे

कुर्डू येथील नागन्नाथ क्रिकेट क्लबचा दुहेरी विजय

CD

KRU26B02577, KRU26B02578
कुर्डू (ता. माढा) ः नागनाथ क्रिकेट क्लब, कुर्डू नगराध्यक्ष जयश्रीताई भिसे यांच्या हस्ते करंडक स्वीकारताना कप्तान व इतर खेळाडू.

कुर्डू येथील नागन्नाथ क्रिकेट क्लबचा दुहेरी विजय

कुर्डू, ता. २४ : येथील नागन्नाथ क्रिकेट क्लब (एनसीसी) संघाने सलग दोन स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावत दमदार कामगिरी केली. भारत-श्रीलंका संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ICC Men''s T20 World Cup च्या पार्श्वभूमीवर कुर्डुवाडीत दोन ठिकाणी स्थानिक टी-२० क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. या दोन्ही स्पर्धांमध्ये नागन्नाथ (एनसीसी) संघाने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत सहज विजय मिळवला.
मावळा ग्राउंड येथे श्रीकांत पाटील, बालाजी पाटील व अजय वाघ यांच्या आयोजनाखाली झालेल्या फ्रेंड्स चषक २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नागन्नाथ (एनसीसी) व मावळा क्रिकेट क्लब यांच्यात सामना झाला. नागन्नाथ संघाने तीन षटकांत ४६ धावांची भक्कम मजल मारत सामना एकतर्फी केला. यात याकूब मेहबूब तांबोळी याने ३५ धावांची झंझावाती खेळी केली. त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर समाधान जगताप याने स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे मालिकावीर पुरस्कार पटकाविला. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे बक्षीस नागन्नाथ संघाने जिंकले.
त्यानंतर नगराध्यक्ष चषक २०२६ स्पर्धेतही नागन्नाथ (एनसीसी) संघाने चमकदार कामगिरी कायम ठेवत विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात भिमानगर क्रिकेट संघावर एकतर्फी विजय मिळवण्यात आला. या सामन्यातही याकूब मेहबूब तांबोळी यालाच सामनावीर पुरस्कार मिळाला, तर समाधान जगताप याला सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे ७१ हजार रुपयांचे बक्षीस नागन्नाथ संघाने पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT