पुणे

नवीन नागपूर प्रकल्पाला विरोध

CD

नवीन नागपूर प्रकल्पाला
शेतकऱ्यांचा विरोध
-----
स्वाक्षरीस नकार; एसडीओ कार्यालयावर आंदोलन
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : गोधणी-लाडगाव खसऱ्याअंतर्गत नवीन नागपूर प्रकल्पासाठी अधिग्रहित होणाऱ्या जमिनीबाबत शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करणार नसल्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात प्रकल्पबाधित शेतकरी उपविभागीय अधिकारी कार्यालयात धडकले.
गुमगाव येथे नुकत्याच झालेल्या सभेत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार प्रस्तावित नवीन नागपूर परिसरात प्रति एकर २००० चौरसफूट भूखंड देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच जमीन मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालय व एनएमआरडीएने आपल्या सोयीनुसार नोंदणी दर घेतल्याने मूल्यांकन मान्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी भूमी अधिग्रहण कार्यालयात जाऊन मूल्यांकन कोणत्या निकषावर करण्यात आले याची माहिती मागितली. तसेच तहसील कार्यालयातही संबंधित निकषाची प्रत मागण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा किशोर आष्टनकर, नरेंद्र टिपले, अजय चाफले, रमेश ठोबरे, प्रमोद आष्टनकर, धनंजय वऱ्हाडे, विष्णू आष्टनकर, योगेश निवंत, भीमराव भुते, युवराज आष्टनकर आदींनी दिला आहे.

कोट ----
शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर सुनावणी घेऊन न्याय द्यावा. योग्य मोबदला व प्रति एकर २००० चौरसफूट भूखंड मिळाल्याशिवाय आम्ही कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करणार नाही.
- किशोर आष्टनकर, प्रकल्पबाधित शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Taxi: अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा, परिवहन मंत्र्याचे सायबर क्राईम विभागाकडे मागणी

BAN vs PAK 1st Test : बांगलादेशने घरी बोलवून पाकिस्तानला ठेचले; WTC मध्ये नाचक्की, शाहीन आफ्रिदीच्या संघाचा लाजीरवाणा पराभव

Kalyan Crime News : कल्याण हादरलं! 78 वर्षीय नराधम भोंदूबाबाचा 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पूजेच्या बहाण्यानं केलं काळं कृत्य

Mohol Accident : ईरटीगा कार आणि मालट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यातील तापमानात पुन्हा वाढ; 42 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले तापमान

SCROLL FOR NEXT