पुणे

बेफाम, बेशिस्त वाहनचालक ठरताहेत जीवघेणे

CD

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. ११ ः राज्यात ‘हिट ॲण्ड रन’च्या घटनांमध्ये नागपूर शहराने धोकादायक आघाडी घेतल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) २०२४ च्या अहवालातून समोर आले आहे. २०२४ मध्ये नागपुरात हिट ॲण्ड रनची ३३१ प्रकरणे नोंदविण्यात आली असून, या घटनांमध्ये मृत्यूचे प्रमाण जवळपास ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मुंबईत १९० तर पुण्यात १२१ प्रकरणे नोंदली गेली असून, त्या तुलनेत नागपुरातील स्थिती अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशभरात २०२४ मध्ये हिट ॲण्ड रनची एकूण ५३ हजार २३० प्रकरणे घडली. यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिल्ली प्रथम स्थानावर असून हिट ॲण्ड रनची एकूण ७०९ प्रकरणे तर यापाठोपाठ गाझियाबादला ४६७ तर पाटणामध्ये ३३२ प्रकरणे समोर आली आहेत. बेफाम वेग, मद्यधुंद वाहनचालक, नियमांचे उल्लंघन आणि कमकुवत वाहतूक अंमलबजावणी ही प्रमुख कारणे असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे.
विशेष म्हणजे, नागपुरातील अनेक प्रमुख चौकांवरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. २०२५ मध्येही ही स्थिती कायम असून, २०२६ मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांतच शहरात ८६ हिट ॲण्ड रन प्रकरणांत २४ जणांचा मृत्यू तर ७९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली.
विशेष म्हणजे, रामझुला प्रकरणासारख्या चर्चित घटनांनंतरही वाहतूक शिस्तीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. एक महिन्यांपूर्वी सीताबर्डी परिसरात एका योग शिक्षिकेचा हिट ॲण्ड रन प्रकरणात मृत्यू झाला. यानंतरही सातत्याने अशा घटना घडतच आहेत. यावर उपाययोजना म्हणून वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
........

इन्फोबॉक्स :
हिट ॲण्ड रनचे भयावह चित्र
देशातील एकूण प्रकरणे (२०२४) : ५३,२३०
नागपूर : ३२७
मुंबई : १९०
पुणे : १२१
मृत्यूचे प्रमाण : जवळपास ९०%

नागपुरातील यंदाची स्थिती
(जानेवारी-एप्रिल)
घटना : ८६
मृत्यू : २४
जखमी : ७९
मुख्य कारणे :
भरधाव वेग, मद्यधुंद वाहनचालक, सीसीटीव्ही बिघाड, वाहतूक नियमांचे उल्लंघन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

Pune Jewellery Market: पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुण्याच्या सराफा बाजारावर काय परिणाम झाला? व्यापारी काय म्हणताएत?

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

SCROLL FOR NEXT