पुणे

शेवगाव - एक कोटींच्या निधीतून शहरातील प्रभाग ११ मध्ये साकारणार नमो उद्यान

CD

ARM26B03234
सुनील काकडे
----------------

शेवगावात उभारणार नमो उद्यान
एक कोटींचा निधी ः प्रभाग अकरामध्ये नियोजन

शेवगाव, ता. २६ : शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शेवगाव नगरपरिषदेच्या प्रभाग ११मध्ये एक कोटी रुपयांच्या निधीतून ‘नमो उद्यान’ साकारण्यात येणार आहे. सौंदर्यात भर घालणारा आणि सर्व वयोगटांसाठी उपयुक्त ठरणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती नगरसेवक सुनील काकडे यांनी दिली.

वाढते शहरीकरण, धावपळीची जीवनशैली आणि सार्वजनिक मोकळ्या जागांची कमतरता लक्षात घेऊन नागरिकांना विरंगुळा, मनोरंजन आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘नमो उद्यान’ उभारण्यात येत आहे. या उद्यानामध्ये आकर्षक वृक्षलागवड, हिरवळीचे विस्तीर्ण क्षेत्र, सुशोभित कारंजे, लहान मुलांसाठी विविध खेळणी, नागरिकांसाठी खुल्या व्यायामशाळेची साधने, तसेच ज्येष्ठ नागरिकांना वेळ घालविण्यासाठी बैठकीची व्यवस्था केली जाणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शहरातील कोरडे वस्ती परिसरालगत नागरिक विनय भारदे यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या योगदानामुळे उद्यान उभारणीच्या कामाला गती मिळाली. त्यांच्या सहकार्याबद्दल नगरसेवक सुनील काकडे यांनी विशेष आभार व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला. शिवसेना नेते अरुण मुंढे, नगराध्यक्षा माया अरुण मुंढे, शिवसेना तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे, ताहेर पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते वजीर पठाण, नगरसेवकांचे सहकार्य लाभल्याचे काकडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT