पाच दशकांहून अधिक काळ आपल्या विलक्षण अभिनयाने चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवला. प्रभावी संवादफेक, सहजसुंदर अभिनय आणि प्रत्येक भूमिकेला जिवंत करण्याची अनोखी हातोटी यामुळे त्यांनी साकारलेली असंख्य पात्रे रसिकांच्या मनात कायमची घर करून राहिली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि ग्रामीण भागातील विविध उपक्रमांसाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नानांनी मोठा आधार दिला होता.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री
माझा आणि नानांचा स्नेह जुना आणि जिव्हाळ्याचा होता. त्यांच्या कडक आणि स्पष्टवक्त्या स्वभावामागे एक अत्यंत हळवं, संवेदनशील आणि माणसांवर मनापासून प्रेम करणारं हृदय होतं. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी आणि गरजूंसाठी त्यांनी उभारलेले सामाजिक कार्य, सामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती यामुळे ते कायमच संवेदनशील माणसाच्या भूमिकेत जगले. त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांच्या आठवणी मनात सदैव जिवंत राहतील.
- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. रंगभूमीपासून सुरू झालेली त्यांची वाटचाल मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अजरामर भूमिका देत एका विलक्षण उंचीवर पोहोचली. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’ यांसह अन्य चित्रपटांतील भूमिका कायम लक्षात राहिल्या आहेत. रोखठोक बोलणारा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा आणि सामान्य माणसाच्या वेदनेशी नातं जपणारा हा अस्सल कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे.
- माधुरी मिसाळ, राज्यमंत्री
नाना पाटेकर यांचे निधन हे अत्यंत वेदनादायी आहे. आपल्या असामान्य अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या नानांनी आपल्या भूमिकांतून अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. दुष्काळग्रस्त शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून येते. त्यांचे पुण्यावर, पुणेकरांवर विशेष प्रेम होते.
- मंजूषा नागपुरे, महापौर, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.