

Yashasvi Jaiswal Practicing Wicketkeeping
Sakal
Yashasvi Jaiswal Focuses on Wicketkeeping: भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल भारताच्या कसोटी संघातील नियमित सदस्य असला, तरी त्याला अद्याप वनडे आणि टी२० संघात स्थान पक्के करता आलेले नाही. नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याला शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.
अशात आता जैस्वाल (Yashasvi Jaiswal) ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत (Ranji Trophy) खेळताना दिसणार आहे. त्याची सिद्धेश लाडच्या (Siddhesh Lad) नेतृत्वातील मुंबई संघात (Mumbai) निवड झाली आहे.