Nanasaheb-Parulekar-Award
Nanasaheb-Parulekar-Award 
पुणे

कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा "डॉ. परुळेकर पुरस्कार'

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे वरिष्ठ बातमीदार मनोज कापडे; तसेच ‘सकाळ’च्या नाशिक आवृत्तीमधील बातमीदार नरेश हळनोर आणि मुंबई आवृत्तीमधील बातमीदार प्रशांत कांबळे यांना यंदाचा ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला. 

विविध विषयांवर आणि सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लेखन करणाऱ्या ‘सकाळ समूहाच्या’च्या बातमीदारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार (कै.) ना. अ. पेंडसे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार देण्यात येतो. ‘सकाळ’चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

कृषी खात्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आणि कृषी उद्योजकांच्या अडवणुकीबाबत कापडे यांनी ‘ॲग्रोवन’मधून दिलेल्या बातम्यांमुळे कृषी खात्याच्या कारभारात अनेक सकारात्मक बदल झाले. राज्य सरकारनेही या बातम्यांची दखल घेऊन कृषी खात्याच्या कामकाजात सुधारणेसाठी पावले उचलली. नाशिक आवृत्तीचे बातमीदार म्हणून काम करणारे हळनोर यांनी ‘इनक्‍युबेटरचा कोंडवाडा’ या वृत्तमालिकेतून नाशिकमधील नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रकरण सप्टेंबर २०१७ मध्ये उजेडात आणले. यानंतर शासकीय पातळीवर झालेल्या कार्यवाहीमुळे जिल्हा रुग्णालयात मरण पावणाऱ्या नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण निम्म्याने कमी झाले.

अपंग विकास महामंडळाकडे राज्यातील अपंग शेतकऱ्यांनी कर्जासाठी अर्ज केला म्हणून अपंग शेतकऱ्यांच्या सातबारावर २०१७ मध्ये कर्जाचा बोजा चढविण्यात आला होता. त्यामुळे अपंग शेतकऱ्यांना कर्ज मिळत नव्हते. याबाबतची कांबळे यांची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अपंग महामंडळाने सातबारावरील कर्जाची तरतूद काढून टाकली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

SCROLL FOR NEXT